पिंपरी-चिंचवड

‘पालिकांच्या व्यायामशाळांमधील गैरप्रकारांना आळा घालावा’

CD

चिखली, ता. ९ : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या व्यायामशाळेत अधिक रक्कम आकारणे, व्यायाम शाळेचा खासगी कामासाठी वापर करणे, पुरेशी व्यायामाचे साहित्य नसणे, खासगी व्यायाम शाळा चालकाकडून अनधिकृत बांधकाम करणे आदी गैरप्रकार सुरू असून, या प्रकाराला त्वरित आळा घालावा, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते सचिन शिंदे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.
एकूण ८६ व्यायाम शाळा आहेत. व्यायामाचे साहित्य नसल्याने त्यातील अर्ध्याहून अधिक व्यायाम शाळा बंद आहेत. मात्र, ज्या व्यायाम शाळा खासगी तत्त्वावर चालविण्यास देण्यात आलेले आहेत, अशा व्यायामशाळेत ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षाही अधिक शुल्क नागरिकांकडून वसूल केले जात आहे. महापालिकेने पंचवीस रुपये डिपॉझिट आणि दहा रुपये महिन्याची फी आकारण्याची परवानगी दिलेली आहे. मात्र, खासगी व्यायामशाळा चालक व्यायामासाठी जाणाऱ्या नागरिकांकडून पाचशे ते हजार रुपये या दरम्यान शुल्क आकारात आहेत. तसेच वाढदिवस तसेच इतर कारणांसाठी ही व्यायामशाळेचा उपयोग केला जात आहे. खासगी व्यायामशाळा चालकांकडून महापालिकेच्या जागेवरच अनधिकृत बांधकाम करून त्याचा वापर करण्यात येत आहे. मात्र, हे प्रकार महापालिका क्रीडा विभागाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही कोणत्या प्रकारची कारवाई केली जात नसल्याचे शिंदे यांचे म्हणणे आहे.
या बाबत सहायक क्रीडा आयुक्त सुषमा शिंदे म्हणाल्या,‘‘महापालिकेने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारल्यास कारवाई करण्यात येईल. परंतु खासगी व्यायामशाळा चालक त्या शुल्कामध्ये व्यायामशाळा चालवणे शक्य नसल्याचे सांगताहेत. या बाबत महापालिकेच्या क्रीडा विभागाकडून विचार करण्यात येईल. व्यायामशाळेत खासगी चालकांकडून अनधिकृत बांधकाम केले असेल तर ते काम अतिक्रमणविरोधी पथकाचे आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT