पिंपरी-चिंचवड

पिरंगुटला शिबिरामध्ये ५७१ जणांचे रक्तदान पिरंगुटतील शिबिरात ५७१ जणांचे रक्तदान

CD

पिरंगुट, ता. २८ : येथील (ता.मुळशी) सनशाईन जॅाय पवळे प्लाझामध्ये आयोजित रक्तदान शिबिरात ५७१ जणांनी रक्तदान केले. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, मुळशीच्या वतीने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदानमासानिमित्त या महारक्तदान यज्ञाचे आयोजन केले होते. शिवछत्रपती आणि संभाजी महाराज यांच्या परंपरेतील असंख्य नरवीरांनी देव, देश आणि धर्मासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या ऋणातून मुक्त झाले पाहिजे याच उदात्त भावनेने हा रक्तदान यज्ञ संपन्न झाला. या महारक्तदान यज्ञात तालुक्यातील ५७१ तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत निरपेक्ष भावनेने रक्तदान केले. पुणे येथील लोकसेवा सोशल फाउंडेशन व पुणे ब्लड सेंटरने सहकार्य केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शंकर मांडेकर यांनीही रक्तदान केले. यावेळी चांगदेव पवळे, प्रकाश पवळे, रमेश पवळे, भीमाजी गोळे, रामभाऊ पवळे, तुषार पवळे, राजू पवळे, राहुल पवळे, प्रवीण कुंभार, विकास पवळे, रामदास गोळे, तसेच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मुळशीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: युवा जोश, उडवली मुंबईची झोप! यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी यांची दे दणादण फटकेबाजी; ११ षटकांत १५० धावा...

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

Rice Export : तणावातही भारतीय तांदळाला इराणमध्ये मागणी; युद्धजन्य परिस्थितीवर मात करत उलाढाल, ६५ लाख टन निर्यातीचा अंदाज

SCROLL FOR NEXT