sakal
पिंपरी-चिंचवड

हसत-खेळत चित्रकला स्पर्धेत ९५० स्पर्धकांचा सहभाग

मंदिरातील निर्माल्य घंटागाडीत

CD

वाकड, ता.२२ : कोरोनात निर्माण झालेल्या परिस्थितीतील वेगवेगळे अनुभव. सतत हात धुणे, मास्क वापरणे, शारीरिक अंतर राखणे इत्यादी अंगवळणी पडलेल्या गोष्टी, दहशत, भीती, अनुभवलेले किस्से, मनात आलेले
विचार, कल्पना, भावभावना आदींना चित्रांतून बालकांना कागदावर उतरविता याव्यात, म्हणून आयोजित हसत-खेळत चित्रकला स्पर्धेत ९५० चिमुकल्यांनी सहभाग घेतला.
सामाजिक कार्यकर्ते गणेश कस्पटे यांच्या संकल्पनेतून स्पर्धेचे आयोजन केले. सावित्रीबाई फुले उद्यान, पिंपळे निलख, कस्पटेवस्ती येथे इयत्ता १ ली ते ८ पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या स्पर्धेसाठी संयोजकांनी कागद मोफत दिला.
यामध्ये प्रमुख पाच बक्षीसे, २५ विशेष उत्तेजनार्थ आकर्षक बक्षीसे व सहभागी प्रत्येक स्पर्धकाला मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक विनायक गायकवाड, नगरसेविका आरती चोंधे, नितीन इंगवले, राम वाकडकर, नामदेव कस्पटे, हिरामन कस्पटे, जगन्नाथ कस्पटे, रामहारी कस्पटे, प्रशांत कस्पटे, मोहन कस्पटे, विशाल मानकर, सुहास कस्पटे, आनंद मानकर, सुरेश मानकर, सोमनाथ मानकर, गोवर्धन गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा निकाल
प्रथम : आदि अजित सागळे (सात हजार व ट्रॉफी),
द्वितीय : अनिष सचिन वाघमारे (सहा हजार व ट्रॉफी),
तृतीय : आयुषी सिंग (पाच हजार व ट्रॉफी),
चतुर्थ : स्वरा शिंदे (चार हजार व ट्रॉफी),
पाचवा : श्रीराज बालगुडे (तीन हजार व ट्रॉफी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! घरगणनेच्या काळातच शिक्षकांची ‘टीईटी’; २१ जूनला होणार शिक्षक पात्रता परीक्षा; २७ मार्च ते १६ एप्रिलपर्यंत करता येणार अर्ज

Merchant Abducted : दीड कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण; अपहृत व्यापाऱ्याची सुखरूप सुटका, पाच आरोपींना अटक

Solapur News : सावळेश्वर टोलनाका पुन्हा वादात! चालकाला रक्तबंबाळ करेपर्यंत मारले; पोलिसांनी आवळल्या मुसक्या.

Pune University : पुणे विद्यापीठाला अखेर मिळाले कुलसचिव; छुप्या पद्धतीने नियुक्ती केल्याचा संघटनांचा आरोप

Pune News : विना अडथळा खोदकाम करता येणार; पाइपलाइन गॅस व सीएनजी वितरणासाठी केंद्र सरकारचा नवा आदेश

SCROLL FOR NEXT