पिंपरी-चिंचवड

‘...अन्यथा महावितरण कार्यालयाला टाळे ठोकू’

CD

पवनानगर, ता. १० : शेतकऱ्यांच्या कृषी पंपावर आव्वाच्या सव्वा वीज बिल आकारले आहे. ते जादा वीज बिल कमी दुरुस्त करून द्या, अन्यथा महावितरण कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
पवनानगर येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कार्यालयात कोथुर्णे, मळवंडी ठुले, वारू या गावासह या भागातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मोटर पंप वीज बिल वाढीच्या विरोधात महावितरणचे उपअभियंता यांना निवेदन दिलेले.
दिलेल्या निवेदनात म्हटले की, शेतकरी शेतीसाठी गरजेपुरता विजेचा वापर करत असून त्या वापरानुसार विज बिल आकारावे. वीज पंपांना आलेले वाढीव बोगस वीज बिल शेतकऱ्यांना पंप एचपीनुसार अथवा मीटर रीडिंग प्रमाणे मिळणे आवश्यक आहे. परंतु, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अंदाजे रीडिंग घेऊन अव्वाच्यासव्वा वीजबिल आकारली आहेत, तर काही शेतकऱ्यांची वीजबिल भरणा न केल्याने कनेक्शन तोडली आहेत. ही वाढीव वीज बिल माफ करून कनेक्शन तोडलेल्या शेतकऱ्यांना आठ दिवसाच्या आत त्वरित कनेक्शन जोडून द्यावे.
या मागण्या ३० जानेवारीपर्यंत मान्य नाही झाल्यास महावितरण कार्यालयाला टाळा लावून ‘टाळाठोक’ आंदोलन करू, असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे. यावेळी माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, ज्ञानेश्वर मोहोळ, तुकाराम निबंळे, मधुकर काळे, हिरामण नढे, लक्ष्मण निबंळे, विष्णू खैरे, ज्ञानेश्वर निबंळे, शिवाजी ढोले, भानुदास सुतार यांनी निवेदन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : एरंडोलमध्ये ८२ सार्वजनिक गणेश मंडळांकडून उत्साहात गणरायाची स्थापना

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचा ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढतो स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT