पिंपरी-चिंचवड

मोशी बोऱ्हाडेवाडीतील पदपथाची दुरवस्था

CD

मोशी, ता. १० : पुणे-नाशिक महामार्गावरील जुना जकात नाका ते बोऱ्हाडेवाडी रस्त्यावरील मोशी उपबाजाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही ठिकाणच्या पदपथांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांसह पादचाऱ्यांना वाहतुकीचा धोका पत्करून भरधाव रस्त्यावरून चालावे लागत असल्याचे नागरिकांनी कळवले आहे.
महापालिकेच्या वतीने सध्या शहरातील सर्वच रस्त्यांचे डांबरीकरण व त्यालगत सुंदर असे पेव्हिंग ब्लॉक बसवून पदपथ तयार करण्यात येत आहेत. मोशी, चिखली, चऱ्होली, जाधववाडी, बोऱ्हाडेवाडी आदी परिसरामध्ये काही ठिकाणी हे पेव्हिंग ब्लॉक बसवण्यात आलेले आहेत.
मात्र, पुणे-नाशिक महामार्गावरील जुना जकात नाका ते श्री नागेश्वर महाराज उपबाजार समिती या दरम्यानच्या रस्त्यावर असलेल्या पदपथांची अत्यंत मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झालेली आहे. या पदपथांखाली जुन्या सांडपाणी वाहिन्या आहेत. या सांडपाण्याने वरील झाकण निघून गेल्यामुळे या ठिकाणी चार ते पाच फुटांचे खड्डे उघडे झाल्याचे दिसून येत आहे. पदांवरील पेव्हींग ब्लॉक ही निघून गेल्याने पादचाऱ्यांना नक्की चालायचे कुठून हा प्रश्न अनेक नागरिकांसह पादचाऱ्यांना उपस्थित केला आहे.

MOS22B01303, MOS22B01304, MOS22B01305

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Sarpanch News : सरपंचांचे अधिकार संपले?, फडणवीस सरकारचा निर्णय; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांना अधिकार

प्रौढ बेपत्ता झाल्यास आता अपहरणाचा गुन्हा, नवी मुंबईत पहिली कारवाई; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी

Leopard Attack Junnar : औषध फवारणीचा पंप ठरला ढाल; बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दाम्पत्य थोडक्यात बचावले

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी तहसीलदारांची खुर्ची जाळली

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

SCROLL FOR NEXT