पिंपरी-चिंचवड

व्यवसायिक बंगल्यांना वाणिज्य दराने कर आकारणी करावी

CD

वाणिज्य दराने कर आकारणी
व्यावसायिक बंगल्यांना हवी

नगरसेवक श्रीधर पुजारी यांची मागणी

लोणावळा, ता. ६ ः लोणावळा नगरपरिषद हद्दीत निवासी वापराऐवजी व्यावसायिक वापर करणाऱ्या निवासी बंगल्यांना वाणिज्य दराने कर आकारणी करावी, अशी मागणी नगरसेवक श्रीधर पुजारी यांनी केली आहे.
लोणावळा आणि खंडाळा ही ब्रिटिश काळापासून थंड हवेची ठिकाणे आणि सध्या पर्यटनस्थळे म्हणून प्रसिद्ध आहेत. विकेंड होम म्हणूनही त्यांना पसंती मिळत आहे.
लोणावळा नगरपरिषद परिक्षेत्रामध्ये सोळा ते सतरा हजार मिळकती आहेत. लोणावळा पर्यटनाचे केंद्र असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर छोटी-मोठी हॉटेल्स, रिसॉर्ट्स आहेत तर बांधकामाबाबतच्या मर्यादेमुळे गावठाण वगळता इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निवासी बंगले आहेत. लोणावळा नगरपरिषदेकडून या मिळकतीवर वापरानुसार घरगुती आणि व्यावसायिक दराने कर आकारणी करण्यात येते.
गेल्या काही वर्षांपासून बंगलेमालक, माळी यांच्याकडून बंगल्यांचा वापर पर्यटकांचे लॉजिंगकरिता करण्यात येत आहे. अशा बंगल्यांची संख्या मोठी आहे. नगरपरिषदेने अशा निवासी बंगल्यांना पाणी पट्टी, घरपट्टी आदी कर आकारणी घरगुती पद्धतीने केलेली आहे. निवासी बंगल्याच्या नावाखाली या बंगल्याचा वाणिज्य वापर होत असल्याने नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान होत असल्याचे श्रीधर पुजारी म्हणाले. वेबसाईट, कॉन्टॅक्ट नंबर, जाहिरात बोर्ड याचा उपयोग करुन व्यावसायिक वापर करणाऱ्या अशा मिळकतींचा शोध घेणे सहज शक्य आहे. नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांमार्फत अशा बंगल्याचा शोध घेवून, अशा बंगल्यांना वाणिज्य दराने कराची आकारणी करावी. त्यामुळे नगरपरिषदेस वार्षिक पाच कोटींचे उत्पन्न प्राप्त होईल, असेही पुजारी यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT