पिंपरी-चिंचवड

जेसीबी डिझेल घोटाळाप्रकरणी उजळाईवाडी सरपंचांना दिलासा

CD

सरपंचांना दिलासा, ग्रामसेवकांवर कारवाई
सीईओंचे चौकशीचे आदेश; उजळाईवाडीतील जेसीबीसाठी डिझेल वापराचे प्रकरण

सकाळ वृत्तसेवा
उजळाईवाडी, ता. ११ : जेसीबीला डिझेलसाठी दिलेल्या धनादेश तक्रारप्रकरणी झालेल्या सुनावणीत उजळाईवाडीच्या (ता. करवीर) सरपंच सुवर्णा माने यांना दिलासा मिळाला, मात्र ठरावाच्या अंमलबजावणीसंदर्भात ग्रामसेवक बी. डी. कापसे यांनी अनियमितता केली आहे. त्यामुळे त्यांची विभागीय चौकशी करावी, असे आदेश जिल्‍हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्‍हाण यांनी दिले.
ग्रामपंचायत सदस्य उत्तम अंबवडे, प्रतिभा पोवार, उज्ज्वला केसरकर, अलका कांबळे, रीना गुमाने, संगीता पाटील, सोनाली मजगे या सात सदस्यांनी लोकनियुक्त सरपंच सुवर्णा माने व तत्कालीन ग्रामसेवक बी. डी. कापसे यांनी संगनमताने २२ हजार २४२ रुपयांचा अपहार केल्याची तक्रार केली होती. संबंधितांवर कारवाईची मागणी केली होती. याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्यासमोर सुनावणी झाली.
गावातील नाले, ओढ्यांची साफसफाई जेसीबीद्वारे केली. साफसफाईचा निर्णय सर्वानुमते घेतला होता. तक्रारदारांसह सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी केलेल्या ठरावाच्या आधारेच ग्रामपंचायतीचा पैसा खर्च झाला आहे. याबाबतचा ठराव सुनावणीसाठी सादर केला. त्यामुळे तक्रारदारांच्या मागणीप्रमाणे केवळ सरपंचांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करणे उचित ठरत नाही. या ठरावाच्या मासिक बैठकीस उपस्थित सदस्यांची सामूहिक जबाबदारी ठरते, असे मत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नोंदवले. झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करणे हे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे कर्तव्य ठरते. त्यामुळे दप्तर अनियमिततेस ग्रामसेवकांना जबाबदार धरण्यात येत असून, त्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले.

कोट
या प्रकरणात सरसकट क्लीन चिट दिली नसून ठरावाच्या अंमलबजावणीत अनियमितता दिसून येत आहे. याबाबत विभागीय चौकशीचे आदेश सीईओंनी दिले आहेत. त्यामुळे विभागीय चौकशीत अपहार सिद्ध होईल. न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे.
- उत्तम आंबवडे, विरोधी गटनेते

विरोधकांनी द्वेषातून तक्रार केली होती. पंचक्रोशीत चांगले गाव म्हणून जळाईवाडीची ओळख आहे. गावाच्या विकासाआड राजकारण येता कामा नये; मात्र विरोधक ठरवून राजकारण करत आहेत. किमान आता तरी सदस्यांनी विचार करून गावच्या विकासासाठी एकत्र यावे.
- सुवर्णा माने, सरपंच, उजळाईवाडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT