पिंपरी-चिंचवड

मावळातील पर्यटन अर्थकारणास ब्रेक लागण्याची चिन्हे

CD

लोणावळा, ता. ११ ः जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि ओमिक्रॉनचा वाढता प्रभाव, या संकटामुळे लोणावळ्यातील भुशी धरण, लायन्स पॉइंट, गड-किल्ले, लेण्यांसह जिल्हाभरातील पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबत आदेश दिले आहेत. पर्यटन बंदीमुळे मावळातील अर्थकारणास पुन्हा एकदा ‘ब्रेक’ लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे लहान-मोठ्या व्यवसायिकांपुढील चिंता वाढली आहे.
पर्यटन ठिकाणी खाद्य पदार्थ विक्रीचे स्टॉल मोठया प्रमाणात लावण्यात आलेले असतात. सदर स्टॉलवर पर्यटक विना मास्क, सोशल डिस्टनसींगचे पालन न करता गर्दी करतात. त्या ठिकाणी मास्कचा वापर, सॅनिटायझेशन, सोशल डिस्टनसींगचे पालन होत नाही. सध्या देशभरात कोरोनाचा उद्रेक झालेला पहावयास मिळत आहे. पुणे ग्रामीण जिल्हयात कोरोना विषाणूचा प्रसार ओमिक्रॉन व्हेरियंटसह मोठया प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर लोणावळा, खंडाळा, कार्ला परिसरातील भुशी डॅम, लायन्स पॉइंट, घुबड तलाव, लोणावळा डॅम, तुंगाली डॅम, राजमाची पॉइंट, अमृतांजन ब्रिज, वलवण डॅम, वेहेरगाव, टायगर पॉइंट, शिवलिंग पॉइंट, कार्ला लेणी, भाजे लेणी, लोहगड किल्ला, तुंग किल्ला, विसापूर किल्ला, तिकोना किल्ला, पवना धरण परिसर इत्यादी स्थळे पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहेत.
पर्यटन स्थळांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू झाला असून, गर्दी आढळल्यास पोलिस गुन्हा दाखल करणार आहे. पर्यटन स्थळ परिसरात ५ किंवा ५ पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र जाण्यास, खाद्यपदार्थ विक्री स्टॉल लावणे, मद्याची वाहतूक करण्यास, ध्वनी व्यवस्था वापरण्यास, प्रदूषण करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
मावळ तालुका, लोणावळा निसर्ग संपदेने समृद्ध आहे. येथील अर्थकारण प्रामुख्याने पर्यटनावर अवलंबून आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत पर्यटन बंदीमुळे अनेकांचे रोजगार, व्यवसाय बुडाले. अनेकांना आर्थिक संकट सोसावे लागले होते. ऐतिहासिक वास्तु, गड-किल्ले, स्मारके, पर्यटनस्थळे, धरणे इत्यादी ठिकाणी नागरिक मोठया प्रमाणात पर्यटनासाठी येत असतात.
सदर ठिकाणी शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी मोठया प्रमाणात नागरिकांची गर्दी होते. मावळत हॉटेल्स, रिसोर्टस, टेंट कॅम्पिंग व्यवसाय आता कुठे बहरत होता. ग्रामीण भागातील अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या होत्या. पण आता पुन्हा एकदा पर्यटन बंदीमुळे व्यावसायिकांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT