मुसळे विद्यामंदिरमध्ये बक्षीस वितरण
इचलकरंजी : तात्यासाहेब मुसळे विद्यामंदिरात विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ झाला. शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांच्याहस्ते विजेत्यांना पारितोषिके दिली. कै. तात्यासाहेब मुसळे यांच्या जयंतीनिमित्त आणि किशोर मुसळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध आंतरशालेय स्पर्धा घेतल्या होत्या. कथाकथन, गोष्ट सांगणे, वक्तृत्व स्पर्धेतील प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व रोख रक्कम असे पारितोषिक देऊन सन्मानित केले. अध्यक्षस्थानी डी. एम. कस्तुरे होते. यावेळी आर. बी. गांजवे, राजेंद्र सांगले, महेंद्र सातपुते, रामचंद्र निमणकर, डी. बी. टारे, सौ. वृशाली होगाडे, आर. पी. भोसले, सौ. ए. ए. जोशी आदी उपस्थित होते.
- - - - - - - -
हनुमान जयंतीनिमित्त कार्यक्रम
इचलकरंजी : सोनपावली हनुमान भक्त मंडळातर्फे हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ८ ते १५ एप्रिलदरम्यान विविध कार्यक्रम होणार आहेत. दररोज सकाळी सामुदायिक दासबोध ग्रंथाचे पारायण तसेच सायंकाळी सात ते आठ या वेळेत प्रवचन, भजन, व्याख्याने होणार आहेत. १६ एप्रिलला जन्मकाळ, सामूहिक शनी महात्म्य वाचन व स्वरदा संगीत विद्यालयाचा भक्तीगीत कार्यक्रम होणार आहे. १७ एप्रिलला महाप्रसादाने उत्सवाची सांगता होईल, याचा लाभ भक्तांनी घ्यावा असे आवाहन केले आहे.
- - - - - - - -
वाढीव शुल्क कमी करा
इचलकरंजी : गुरुवर्य रविंद्रनाथ टागोर ग्रंथालयाचे वार्षिक वाढीव शुल्क कमी करावे, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष रोहित कोटकर यांनी मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. प्रदीप ठेंगल यांना दिले. गुरुवर्य रविंद्रनाथ टागोर ग्रंथालय कित्येक वर्षे इचलकरंजीमधील विद्यार्थ्यांना वार्षिक शुल्क ५० रुपये आकारले जाते. नगरपालिका प्रशासनाने त्या फीमध्ये ९० टक्के वाढ केलेली आहे. ही वाढीव शुल्क कमी करावे. सध्याची आहे तेवढेच शुल्क पूर्ववत करावे, अशी मागणी मनसे विद्यार्थी सेनने केली. अन्यथा नगरपालिकेवर आंदोलन करण्याचा इशारा दिला.
- - - - - - - - - -
रमेश बम्मन्नावर यांचा सत्कार
इचलकरंजी : दि इचलकरंजी बार असोसिएशनतर्फे रमेश बम्मन्नावर यांचा न्यायसंकुलनामध्ये उत्कृष्ट सेवाकार्याबद्दल सत्कार केला. बम्मन्नावर यांचा सत्कार जिल्हा न्यायाधीश र. ना. बावनकर व बार असोसिएशनचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी यांच्याहस्ते केला. न्यायाधीश शेळके, न्यायाधीश कोकरे, न्यायाधीश पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन विवेक तांबे, श्री. निर्मळ, अनिल बम्मनावर, महावीर मोळेकर, मोहन बोरगावे आदींनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.