पिंपरी-चिंचवड

‘चांगभलं’च्या गजरात भैरवनाथांची यात्रा

CD

01967
---------------
‘चांगभलं’च्या गजरात भैरवनाथांची यात्रा
महाराष्ट्रासह कर्नाटकातून भाविक; गुलाल खोबऱ्याची मुक्त उधळण
खोची, ता. १७ : गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत भैरोबाच्या नावानं चांगभलं, जोगेश्वरीच्या नावानं चांगभलंच्या अखंड गजरात येथील भैरवनाथांची चैत्र यात्रा लाखभर भाविकांच्या उपस्थितीत झाली. महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकांची उच्चांकी उपस्थिती होती. रात्री बारा वाजता मुख्य पालखी सोहळा झाला. गुलाल खोबऱ्याच्या मुक्त उधळणीत चैत्रबन न्हाऊन गेला होता. हलगी-कैचाळ, ढोल-ताशांच्या, तुतारीच्या निनादात भक्तीभावाने रात्रभर सासनकाठ्या पालखीपुढे दिमाखात नाचत होत्या.
शनिवारी पहाटे विधीवत अभिषेक करून श्रींची बैठ्या रूपातील पूजा बांधल्यानंतर येथील मानकरी दिलीपराव सूर्यवंशी-सरकार यांचा मानाचा नेवैद्य वाजत-गाजत मंदिरात आला. त्यानंतर दिवसभर हजारो भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. मध्यरात्री बारा वाजता श्रींची पालखी मंदिरातून बाहेर आल्यानंतर लाखभर भाविक चांगभलंचा गजर करीत मुख्य सोहळ्यात सहभागी झाले. श्रींची पालखी चैत्रबनात आल्यानंतर अमरसिंह चावरेकर-शिंदे सरकार यांची मानाची सासनकाठी प्रथम भेटली. त्यानंतर इतर सासनकाठ्या भेटीला आल्या. रात्रभर गुलालाच्या उधळणीत सासनकाठ्या नाचत होत्या. यावेळी शोभेच्या दारूची आतषबाजी केली. पालखी मिरवणुकीत खोची, बुवाचे वठार, कोल्हापूर, कुंडल, मायणी, विटा, अष्टा, कुंभोज, माणकापूर, लाटवडे, घुणकी, शिगाव, तळसंदे, भोज (कर्नाटक) आदीसह शंभराभर सासनकाठ्या सहभागी झाल्या होत्या.
पालखीला तावडे, काटकर-भोई बांधवांनी खांदा दिला होता. पालखीसमवेत बाबर, गोसावी बांधव चांदीच्या काठ्या घेऊन श्रींची राखण करत होते. जाधव परिवार वारा घालत होते. गुरव-पुजारी धुपारतीसह, मगदूम बांधव अब्दागिरी, चर्मकार बांधव मशाली घेऊन नाभिक बांधव शिंगाची ललकारी देत होते. चैत्रबनात पालखी मानकऱ्यांचा सत्कार केला. सईच्या झाडाखाली पालखी आल्यानंतर आरती केली. पालखी वारणा नदी तीरावर नेऊन श्रींच्या मूर्तीला जलाभिषेक घालून पालखी पळवत मंदिरात आणली.
पहाटे श्रींच्या मूर्तीवर रुद्राभिषेक भाविक जोशी यांच्या मंत्रोच्चारात केला. भैरवनाथ व सहचारिणी जोगेश्वरी यांच्या विवाहासाठी वस्त्रालंकृत पूजा बांधली व हजारो भाविकांच्या उपस्थितीत सूर्योदयाला नाथबुवांच्या साक्षीने विवाहसोहळा झाला. त्यानंतर गुलालाने माखलेल्या अंगाने चांगभलचा गजर करत उगवत्या सूर्याचे दर्शन घेत भक्तगण घरी परतले. अनेक भाविकांनी वारणा नदी ते मंदिरापर्यंत दंडवत घातले. पोलिस निरीक्षक संतोष घोळवे, भीमगोंडा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवला होता.
----------
गावयात्रा २४ तारखेला
ग्रामपंचायत प्रशासनाने आरोग्य, पाणी, पार्किंग यांचे व्यवस्थापन केले होते. रविवारी (ता.२४ एप्रिल) गावयात्रा आहे. याचदिवशी रात्री दहा वाजता पालखी सोहळा, तसेच ३० एप्रिलला पाकाळणी यात्रेत दुपारी बारा वाजता पालखी सोहळा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FOREIGN JOB OPPORTUNITIES: या राशींच्या लोकांना मिळू शकते परदेशात जाण्याची संधी; करिअर आणि पैशांसाठी ठरू शकतो मोठा टर्निंग पॉइंट

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Water Scarcity : अंबड तालुक्यात पाणी टंचाईचे सावट: लघु,पाझर तलाव कोरडेठाक तर विहिरी, कूपनलिका ची पाणी पातळी चालली खालावत

CSK Head Coach: जहीर खानकडे चेन्नई सुपर किंग्सची धुरा! IPL 2027 साठी माजी भारतीय स्टारची हेड कोचपदी नियुक्ती, CSKचा मोठा निर्णय

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT