पिंपरी-चिंचवड

आदिवासी विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप

CD

मावळ पत्रकार संघाकडून
विद्यार्थांना स्वेटरचे वाटप
वडगाव मावळ, ता. ८ ः पत्रकार दिनानिमित्त मावळ तालुका ग्रामीण पत्रकार संघाने मावळ तालुक्याच्या डोंगराळ व दुर्गम भागातील उकसान पठार व करंजगाव पठारावरील आदिवासी वस्त्यांना भेट देऊन, विद्यार्थ्यांना स्वेटरचे वाटप केले. सर्पदंशाने मृत्यू झालेल्या शिक्षकाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली.
पत्रकार दिनानिमित्त सकाळी संघाच्या कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर करंजगाव व उकसान पठारावरील आदिवासी वस्त्यांना भेट देऊन विद्यार्थी व मुलांना स्वेटरचे वाटप केले. सर्पदंशाने मृत्युमुखी पडलेल्या भाऊ आखाडे या शिक्षकाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली. दुर्गम ठिकाणी जाऊन ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांचा विशेष सत्कार करण्यात आला. ग्रामस्थांशी संवाद साधून, तेथील समस्या जाणून घेतल्या. या उपक्रमात संघाचे अध्यक्ष भारत काळे, माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर वाघमारे, विजय सुराणा, गणेश विनोदे, सुदेश गिरमे, चंद्रकांत लोळे, सचिन शिंदे, ज्ञानेश्वर ठाकर, संकेत जगताप, दिलीप कांबळे, सचिन ठाकर, रवी ठाकर, नीलेश ठाकर, योगेश घोडके, चंद्रकांत असवले, सुभाष भोते, बाबूराव काळे, उत्तम ठाकर, अभिषेक बोडके, किशोर ढोरे, संजय हुलावळे, केदार शिरसाठ आदी सहभागी झाले होते.
छायाचित्र: उकसान पठार: 1)आदिवासी विद्यार्थ्यांना स्वेटरचे वाटप करताना मावळ ग्रामीण पत्रकार संघाचे पदाधिकारी.
2)करंजगाव पठार; आदिवासी विद्यार्थ्यांना स्वेटरचे वाटप करताना मावळ ग्रामीण पत्रकार संघाचे पदाधिकारी.
फोटो ः 03129, 03130

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: संतांची भूमी आणि भोंदूंचा उच्छाद; अशोक खरातसारख्या नीचला राजकीय आश्रय? पोस्टमधून राज ठाकरेंचा संताप, काय म्हणाले?

US Israel Iran War : मोठं संकट ओढावणार ! पेट्रोल-डिझेलचे दर ५० ते ६० रूपयांनी महागणार ? खासदाराच्या दाव्याने खळबळ

MLA Amol Mitkari: विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमदार अमोल मिटकरींचे आंदोलन; अजित पवार यांच्या मृत्यूबाबत तातडीच्या चर्चेची मागणी!

Nanded News: दहा गावांत पाणीटंचाई, अधिग्रहणासाठी प्रस्ताव; ईस्लापूर परिसरातील गावांचा समावेश

Nanded News: जिल्ह्यात अतिवृष्टीचा हळदीला मोठा फटका; उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांची घट, शेतकरी पुन्हा सापडले संकटात

SCROLL FOR NEXT