पिंपरी-चिंचवड

नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई

CD

वडगाव मावळ, ता. १० : ‘‘कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सरकारने घातलेल्या निर्बंधांची व्यावसायिक व नागरिकांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी,’’ असे आवाहन वडगावचे पोलिस निरीक्षक विलास भोसले यांनी केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सोमवारपासून कारवाई करण्यात येणार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
सरकारने घालून दिलेल्या नियमानुसार सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट रात्री दहा वाजता बंद होतील. रात्री अकरा ते सकाळी पाच या वेळात संचारबंदी असेल. कोणीही अत्यावश्यक कारण वगळता घराबाहेर दिसल्यास त्यांच्यावर कारवाई होईल. अत्यावश्यक कारण म्हणजे काय हे सरकारच्या देशांमध्ये नमूद करण्यात आले आहे. निर्बंधांबाबत पोलिस ठाण्याचे सर्व प्रभारी अधिकारी पोलिस स्टेशनच्या वाहनांमधून मुख्य बाजारपेठा व सार्वजनिक ठिकाणी जनजागृती करतील. नगरपंचायत व ग्रामपंचायतींही निर्बंध व दंड याबाबत लोकांना जागृत करतील. सुरुवातीला लोकांना केवळ वॉर्निंग देण्यात येईल व त्यांचे फोटो घेऊन ग्रुपवर टाकण्यात येतील व लेखी पत्र देऊन अवगत करण्यात येईल. सोमवारपासून दंडात्मक कारवाईला सुरुवात होईल, अशी माहिती भोसले यांनी दिली.

सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध
- मंगल कार्यालय व रिसॉर्ट यांनी विवाह समारंभासाठी येणाऱ्या पन्नास लोकांची यादी सादर करणे आवश्यक
- राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना पन्नासपेक्षा अधिक अशी परवानगी देता येणार नाही.
- कार्यक्रमाचे उल्लंघन केल्यास आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार
- क्रिकेट, फुटबॉल आदींच्या स्पर्धा भरविण्यास बंदी
- पर्यटन स्थळे, किल्ले या ठिकाणी पर्यटक गर्दी करणार नाहीत यासाठी फिक्स्ड पॉइंट बंदोबस्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT