पिंपरी-चिंचवड

शेतकऱ्यांनी अफवांना बळी पडून नये - आमदार सुनील शेळके

CD

वडगाव मावळ, ता.१४ : तळेगाव (निगडे) एमआयडीसी टप्पा क्रमांक चार मधील निगडे, कल्हाट व पवळेवाडी या तीन गावातील इको सेन्सिटिव्ह झोन काढण्याबाबतचा प्रस्ताव, राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवला असून, तो येत्या फेब्रुवारी महिना अखेर पर्यंत मार्गी लागेल, अशी माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली. त्यामुळे शेतकऱ्यांनी अफवांना बळी पडून जमीन विक्री करू नये असे आवाहनही त्यांनी केले.
आमदार शेळके यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत एमआयडीसी टप्पा क्रमांक चारच्या सद्यःस्थितीची माहिती दिली. या टप्प्यातील आंबळे गावच्या भू-संपादनाची प्रक्रिया मार्गी लागली असून, शेतकऱ्यांना जमिनीचे पेमेंट एमआयडीसीचे अधिकारी गावात जाऊन करणार आहेत.
इको सेन्सिटिव्ह झोन मुळे इतर तीन गावांचे भूसंपादन रखडले आहे. हा झोन काढून टाकण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला आहे. तो मंजूर करण्यासाठी दिल्लीला जाऊन पाठपुरावा करण्यात येईल. ज्या शेतकऱ्यांना जमिनी द्यायच्या नाहीत. त्यांच्या जमिनी भूसंपादनातून वगळण्यात येतील. मात्र त्या मध्यभागी येत असल्यास त्यांना पर्यायी जमिनी देण्यात येतील.
एमआयडीसीत समाविष्ट होणाऱ्या गावांना विकास कामांसाठी प्रत्येकी पंचवीस एकर जमीन राखून ठेवण्यात येईल, अशी माहिती आमदार शेळके यांनी दिली.

लसीकरण सक्तीचे
तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन नागरिकांनी दिलेले निर्बंध पाळणे गरजेचे आहे. पहिल्या डोसचे शंभर टक्के उद्दिष्ट्य पूर्ण झाले असले तरी अद्याप ४४ हजार नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला नाही. तो त्वरित घ्यावा. लवकरच तालुक्यातील सर्व शहरांजवळ चेक पोष्ट उभारून, याबाबतची तपासणी करण्यात येणार आहे. दुसरा डोस न घेतलेल्या नागरिकांना जागेवरच तो देण्याची व्यवस्था केली जाणार आहे, अशी माहिती आमदार शेळके यांनी दिली. दरम्यान, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी नुकत्याच केलेल्या आरोपांचा आमदार शेळके यांनी यावेळी समाचार घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

Yoga Tips : उत्तम पचनक्षमतेसाठी योगा फायदेशीर, जेवण झाल्यावर करा ‘या’ योगासनांचा सराव

Samantha Ruth Prabhu: एकवेळेच्या जेवणाचीही होती भ्रांत अन् आज आहे कोट्यवधींची मालकीण; 'ऊ अंटावा' गर्ल समंथाचा सुपरस्टार होण्याचा प्रवास

SCROLL FOR NEXT