पिंपरी-चिंचवड

बेलजमध्ये शाळेला ई-लर्निंग संच भेट

CD

वडगाव मावळ, ता. १५ : स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून टाटा ब्ल्यूस्कोप स्टील प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने मावळ तालुक्यातील बेलज येथील जिल्हा परिषद शाळेला ई-लर्निंग संच भेट देण्यात आला. या संचामध्ये प्रक्षेपक, पटल, संगणक, संगणकप्रणाली यांचा समावेश आहे.
त्यासोबतच अन्य चार संगणक, कपाटे, टेबल्स, खुर्च्या असे साहित्य देण्यात आले. कंपनीचे सामाजिक उत्तरदायित्व अधिकारी शिक्षा मिश्रा यांच्या हस्ते हे साहित्य शाळेच्या मुख्याध्यापकांना प्रदान करण्यात आले. ग्रामीण महिला सबलीकरणासाठी आर. डी. ऑर्गनिक फार्मच्या आवारात शिलाई मशिन प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून तयार केलेल्या वस्तू शहरात विकण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठीही टाटा ब्ल्यूस्कोप स्टील कंपनीने शिलाई मशिन्स प्रदान केले. समाजातील गरजू व्यक्ती आणि संस्था यांना योग्य ती मदत मिळवून देणे, कंपन्यांच्या सी. एस. आर. विभागाशी संपर्क साधून त्यांच्या मदतीने समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या गरजांची पूर्तता करणे आणि मदत म्हणून दिलेल्या वस्तूंचा योग्य वापर व्हावा यासाठी लक्ष देणे यासाठी लायन्स क्लब ऑफ पुणे फीनिक्सने एका विशेष फाउंडेशनची स्थापना केली आहे. त्या फाउंडेशनच्या माध्यमातून हे दोन्ही उपक्रम राबविण्यात आले. या दोन्ही उपक्रमांसाठी डॉ. संजय लकडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रसंगी लायन्स क्लबचे जिल्हा प्रांतपाल हेमंत नाईक, लायन्सचे केंद्रीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, विभागीय अध्यक्ष कविता चेकर, लायन्स क्लब ऑफ पुणे फीनिक्सचे अध्यक्ष नरेंद्र पेंडसे, दीपश्री प्रभू, प्रसाद दिवाण, जया सिंघवी, सुरेश गुरव, यशवंत भोंग, स्वप्नील वाघमारे आदी उपस्थित होते. संगीता शाळिग्राम आणि रजनी देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. वनिता लकडे यांनी आभार मानले.
VDM22B03174, VDM22B03175

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तानचं हे अती झालं! म्हणतात 'हंस्तादोलन' प्रकरणावर कारवाई करा अन्यथा UAE च्या लढतीवर बहिष्कार टाकतो...

Latest Marathi News Updates : आष्टीत पुरामुळे इमारतीवर अडकलेल्या साप्ते कुटुंबाचं हेलिकॉप्टरने रेस्क्यू

खूपच इमोशनल... प्रेक्षकांना कसा वाटला 'लपंडाव' मालिकेचा पहिला भाग? नेटकरी म्हणतात- रुपालीऐवजी दुसरी कुणी...

Crime: अनैसर्गिक कृत्य! २ तरुणांच्या गुप्तांगावर २३ वेळा स्टेपल अन् मिरचीचा स्प्रे...; जोडप्याचा कारनामा, भयंकर कारण समोर

Crime News : नाशिकमधील बेकायदा कॉल सेंटरवर सीबीआयची धाड; यूकेतील नागरिकांना गंडा

SCROLL FOR NEXT