Sakal
पिंपरी-चिंचवड

पान २

पॉलिहाउसमधील कामगार चाळीत पत्नीचा खून करून तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव रचणाऱ्या एका परप्रांतीय तरुणाला वडगाव पोलिसांनी केली अटक.

CD

पॉलिहाउसमधील कामगार चाळीत पत्नीचा खून करून तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव रचणाऱ्या एका परप्रांतीय तरुणाला वडगाव पोलिसांनी केली अटक.

वडगाव मावळ - मावळ तालुक्यातील निगडे येथील एका पॉलिहाउसमधील कामगार चाळीत पत्नीचा खून (Wife Murder) करून तिने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याचा बनाव रचणाऱ्या एका परप्रांतीय तरुणाला वडगाव पोलिसांनी (Police) अटक (Arrested) केली. ही घटना सोमवारी रात्री घडली.

सुनील रूपचंद बंजारे (वय २७, मूळ रा. चुरतेला, पो. खरखोद ता. पामगड, जि. जहांगीर चांपा, छत्तीसगड, हल्ली रा. विनय गोपाळ सांबारे यांचे पॉलिहाउसच्या आवारामधील कामगार चाळ, निगडे ता. मावळ) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या परप्रांतीय तरुणाचे नाव आहे. सतरूपा सुनील बंजारे (वय २४) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. अरुणकुमार भारद्वाज (वय १९, सध्या रा. निगडे) याने याबाबत फिर्याद दिली आहे.

वडगावचे पोलिस निरीक्षक विलास भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुनील हा निगडे येथे विनय सांबारे यांच्या पॉलिहाऊसमध्ये मजूर म्हणून कामाला आहे. व तेथील कामगार चाळीत पत्नीसह राहत होता. सोमवारी रात्री त्याने मारहाण करून व गळा दाबून तिचा खून केला. कोणाला काही समजू नये म्हणून ओढणीच्या साह्याने खोलीच्या छताच्या अँगलला लटकवून तिने गळफास घेतल्याचा व स्वतः झोपेत असल्याचा बनाव रचला. खुनाचे कारण समजू शकले नाही. उपविभागीय पोलिस अधिकारी पाटील व पोलिस निरीक्षक विलास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक वडोदे पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

FDA Crime : ‘क्रीमी डिलाइट’, महावीर डेअरीवर एफडीएची कारवाई; लाखो रुपयांचे पदार्थ आढळले असुरक्षित

Teachers Agitation : सामूहिक रजा घेत शिक्षकांचे आंदोलन; पंचायत समितीवर मोर्चा, पाच तास धरणे आंदोलन, मुख्यालयाची अट शिथिल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT