पिंपरी-चिंचवड

वगसम्राट इंदुरीकरांची जन्मशताब्दी साजरी करावी

CD

तळेगाव स्टेशन, ता. १६ : मावळचे भूमिपुत्र विनोदी वगसम्राट दिवंगत दादू इंदुरीकर यांची जन्मशताब्दी महाराष्ट्र सरकारने साजरी करावी, असे मागणी विनोद सम्राट दादू इंदुरीकर प्रतिष्ठानतर्फे मंगळवारी (ता. १६) मुंबईत आयोजित पत्रकार करण्यात आली.
मुळचे इंदुरीचे विनोद सम्राट दादू इंदुरीकर यांनी त्यांच्या गाढवाचं लग्न या वगनाट्याद्वारे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी इंदुरीकरांचे महाराष्ट्राचा पॉल मुनी असे वर्णन केले होते. अशा विनोद सम्राटाची जन्मशताब्दी २०२२ मध्ये महाराष्ट्र सरकारने साजरी करताना राज्याच्या सहा महसूल विभागांमध्ये दादू इंदुरीकर यांच्या वगनाट्य आणि लोकनाट्याचे महोत्सव आयोजित करावेत. दादू इंदुरीकर यांच्या पुणे जिल्ह्यातील इंदुरी या गावी त्यांचे उचित स्मारक उभे राहावे. तेथे लोकसाहित्य लोककला तमाशा कलेचे अद्ययावत ग्रंथदालन उभे राहावे. तमाशा कलावंतांसाठी रंगमंच हा असावा तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या शिल्पकार योजनेखाली दादू इंदुरीकर यांचे चरित्र प्रकाशित व्हावे, अशी मागणी या वार्ताहर परिषदेत विनोद सम्राट दादू इंदुरीकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ. प्रकाश खांडगे यांनी केली. महाराष्ट्र सरकारने राज्य चित्रपट महोत्सव राज्य लावणी महोत्सव, राज्य तमाशा महोत्सव, अखिल भारतीय साहित्य संमेलन अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन या धरतीवर दादू इंदुरीकर प्रतिष्ठानतर्फे आयोजित होणाऱ्या लोककला महोत्सवासाठी भरीव आर्थसहाय्य करावे. महाराष्ट्र सरकारने सांस्कृतिक पुरस्कारांच्या यादीत वगसम्राट दादू इंदुरीकर पुरस्कार देखील जाहीर करावा. तमाशा कलावंतांच्या मुलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे निवासी आश्रमशाळा प्रतिष्ठानच्या माध्यमातून उभी राहावी. त्याला सरकारने सहकार्य करावे, अशी मागणी उपाध्यक्ष डॉक्टर गणेश चंदनशिवे यांनी याप्रसंगी केली. वगसम्राट दादू इंदुरीकर यांच्या काळातील ज्येष्ठ तमाशा कलावंतांचे ध्वनिचित्र मुद्रण मुलाखतींच्या स्वरूपात व्हावे. पारंपरिक तमाशाचा अनमोल ठेवा जतन व्हावा, अशी मागणी ज्येष्ठ कादंबरीकार आणि प्रतिष्ठानचे विश्वस्त विश्वास पाटील यांनी केली. प्रतिष्ठानचे विश्वस्त प्रभाकर ओव्हाळ, सोपान खुडे, खंडू गायकवाड, सुरेश धोत्रे, अॅड. रंजना भोसले, राजेंद्र सरोदे, संजय चव्हाण याप्रसंगी उपस्थित होते.

मुंबई: पत्रकार परिषदेत बोलताना विनोद सम्राट दादू इंदुरीकर प्रतिष्ठानचे पदाधिकारी.
TLS22B03221

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT