पिंपरी-चिंचवड

संकष्टी चतुर्थी निमित्त संगीत सभा

CD

पिंपरी, ता. २३ : चिंचवड देवस्थान ट्रस्ट व नादब्रम्ह परिवार द्वारा आयोजित संकष्टी चतुर्थी निमित्त संगीत सभा झाली. त्यामध्ये डॉ. रवींद्र घांगुर्डे यांचे शास्त्रीय गायन झाले. मारुती पवन यांच्या तमीळ रचना सादर झाल्या. पहिली रचना ‘विक्षे करा देवा’ ही राज आनंदी भैरवी रागातील तर दुसरी वेदाद्री शिखरा नरसिंह ही होती. गायनाचा प्रारंभ पुरिया कल्याण रागाने केला. ‘काहें सोच विचार करे मन...’ ही विलंबित एक तालातील बंदिश गात विविध रंगाची स्वर बरसात केली.
जोड बंदिश ‘आली री मोरा मन हार लीनो’ ही मितालातील बंदिश होती. त्यानंतर ‘कौन गली गयो शाम’ ही दुसरी पेश केली. पाठोपाठ खमाज रागातील खुमासदार रंगतीने रसिकमने तृप्त केली. त्यांना समर्पक संवादिनी साथ उपेंद्र सहस्रबुद्धे, तसेच तबला साथ विघ्नहरी देव यांनी दिली. शेवटी सर्वांशी ‘सुंदरु कासे पितांबर’ हे भक्तिगीत व नाम घ्या हो मोरयाचे हे गाऊन सभा समाप्त झाली. त्यांना स्वर साथ दर्शन कुलकर्णी व टाळसाथ दूर्वांकुर कुलकर्णी यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-CNG Price: कच्चे तेल स्वस्त झाल्यानंतर आज देशात नवे इंधन दर जाहीर! आता 1 लिटर पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

Lionel Messi: दुखापतीनंतर मेस्सी मैदानावर उतरण्यास सज्ज, पण चाहत्यांची धाकधूक वाढली! उद्या सकाळी ६.३० वाजता काय घडणार?

Latest Marathi News Live Update : 'लिव्ह-इन रिलेशनशिप' मध्ये राहणाऱ्या जोडप्याला पोलीस संरक्षण देण्यास पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा नकार

Nagpur: विमानतळ २५ जूनला होणार हस्तांतरित; ७ हजार कोटींची गुंतवणूक ; विदर्भासाठी ठरणार ‘गेमचेंजर’

73 व्या वर्षीही दाट केसांचं रहस्य! प्रियांका चोप्राच्या आईचा DIY घरगुती हेअर मास्क viral; पाहा कसा बनवायचा

SCROLL FOR NEXT