पिंपरी-चिंचवड

पीएमपीएमएल कर्मचारी सातव्या वेतन आयोगाच्या प्रतिक्षेत

CD

पिंपरी, ता. ३१ : सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने पुणे महापालिका व पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचाऱ्यांना, सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला आहे. पीएमपीएमएल हे दोन्ही महापालिकांचा भाग असल्याने, महामंडळा कडील सेवकांना देखील महापालिकेप्रमाणे, सातवा वेतन आयोगाच्या धर्तीवर सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी, पीएमपी कामगार संघटनांनी केली आहे.
संचालक मंडळाने २५ फेब्रुवारी २०२१ च्या मान्य ठरावानुसार मंजुरी देखील दिलेली आहे. पीएमपीएलकडील सेवकांना डिसेंबर पेड ईन जानेवारीपासून आयोगाच्या धर्तीवर सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याची व नियमित संचलन तुटी व्यतिरिक्त अधिकचा निधी मिळण्याबाबतचा, प्रस्ताव दोन्ही महापालिकेकडे सादर केला आहे. परंतु, अद्यापपर्यंत महामंडळाकडील सेवकांना सातवा वेतन आयोग लागू झाला नाही. सद्यःस्थितीत वाढती महागाई, तुटपुंजा पगारामुळे कर्मचारी आर्थिक विवंचनेत असल्याने कामगारांमध्ये नाराजी दिसून येत आहे. सातवा वेतन आयोग लवकरात लवकर लागू करावा, अशी मागणी कामगार संघटनांकडून सातत्याने होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात खळबळ ! नामांकित महाविद्यालयाच्या प्राध्यापकाने संपवले जीवन, राहत्या घरी घेतला गळफास; धक्कादायक कारण समोर

'मी त्याला जोरात ढकललं, आणि...' श्रुती मराठेनं सांगितला 'राधा ही बावरी'च्या सेटवरील सौरभसोबत किस्सा, म्हणाली...

All England Open: आता 'लक्ष्य' ऐतिहासिक विजेतेपद! Lakshya Sen ने अंतिम फेरी गाठून घडवलाय इतिहास

8th Pay Commission : आठवा वेतन आयोग लागू होण्याआधी DA बाबत मोठी अपडेट, तुमच्या महागाई भत्त्यात होणार 'इतकी' वाढ

Latest Marathi News Live Update : पुणे विद्यापीठ चौकातील एकात्मिक दुमजली पुलाला अजितदादांचे नाव देण्याचा निर्णय घेऊ- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT