पिंपरी-चिंचवड

कुटूंबात जन्मलेल्या कन्यारत्नाने घरात पहिलं पाऊल टाकताना होतेय ग्रँड स्वागत

CD

पिंपरी, ता. १ : कुटुंबात जन्मलेल्या कन्यारत्नाचे ''मेरे घर आयी एक नन्हीं परी'' असे म्हणत ग्रँड स्वागत करण्याचा ट्रेंड सध्या शहर व परिसरात रुजत आहे. लक्ष्मीच्या रूपाने चिमुकली घरात पहिलं पाऊल टाकताना एखाद्या सणाप्रमाणे आनंद सोहळा साजरा केला जात असल्याचे सध्या दिसून येत आहे. यातून एकप्रकारे ''बेटी बचाव''चा संदेश दिला जात आहे.

मुलगी जन्माला आली की, विवाहितेला दोष देण्यासह कुटुंबातही कलह होत. मुलगी म्हणजे परक्या घरचे धन, अशी भावना होती. मात्र, आता मुलीच्या जन्माचा द्वेष करणाऱ्यांचे प्रमाण काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. वंशाला दिवा असावा म्हणून मुलगाच हवा, असा हट्ट धरणाऱ्यांचा जमाना आता गेला आहे. नकोशी वाटणारी मुलगी हवीहवीशी वाटू लागली आहे. त्यामुळे कुटुंबात मुलगी जन्माला आल्यानंतर आता मोठे सेलिब्रेशन केले जात असून इतर सोहळ्याप्रमाणेच कन्यारत्न स्वागताचाही सोहळा साजरा होत आहे. कन्यारत्न घरी येण्याचा पहिला दिवस म्हणजे कुटुंबासाठी आनंद सोहळाच असल्याचे दिसून येत आहे.

कन्या घरी येताच घरातील सुवासिनी कन्येसह तिच्या आईला औक्षण करतात. ते येणाऱ्या मार्गावर फुलांच्या पायघड्या घातल्या जातात. यासह घराला सुंदर सजावट करून गोडधोड जेवण केले जाते. लक्ष्मीच्या रूपाने चिमुकली आपल्या घरी आली, या भावनेने तिची पाऊलं कुंकवाच्या पाण्यात भिजवून घरात उमटविली जातात. त्यानंतर देवघरात दर्श घेऊन चिमुकलीला आकर्षक फुलांनी सजविलेल्या पाळण्यात ठेवले जाते.
सर्व कुटुंबीय एकत्र येत फटाक्याची आतषबाजी, फोटो शूट, शुभेच्छा देत हा आनंद सोहळा रंगतो. पिंपरी-चिंचवड शहरासह परिसरातही अशाप्रकारे चिमुकलीचे स्वागत करण्याचा चांगला ट्रेंड रुजत असल्याचे दिसून येत आहे.
----------
सोशल मीडियावरही स्वागत
‘आमच्या घरी लक्ष्मी आली’, ‘मेरे घर आयी नन्हीं परी’, ‘बेटी धनाची पेटी’ अशा पोस्टसह घरातील स्वागताचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केले जात आहेत. त्यामुळे सोशल मीडियावरही चिमुकलीचे जोरदार स्वागत होत असून शुभेच्छांचा वर्षाव होतो.
------------------------------------------
''बेटी बचाव''चा संदेश
अशा प्रकारे कन्येच स्वागत करून ''बेटी बचाव''चाही संदेश दिला जात आहे. मुलगा-मुलगी असा भेदभाव न करता मुलाप्रमाणे मुलगीही तितकीच महत्वाची असल्याचे पटवून दिले जात आहे.
-----------------------
आम्हाला मुलगीच हवी होती. मुलगी म्हणजे मायेचा सागर आहे. मुलगी झाल्यानंतर माझ्यासह कुटुंबियांना खूप आनंद झाला. लाडक्या लेकीचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी अगोदरपासूनच तयारी केली होती. सर्व कुटुंबियांनी एकत्र येत ग्रॅंड वेलकम केले. हा क्षण आमच्यासाठी सर्वोच्च आनंदाचा होता.
- नीलेश गिलबिले, भोसरी
---------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुसळधार पावसाचा फटका! स्वारगेट मेट्रो स्थानकांत गळती, प्लॅटफॉर्मवर ठेवल्या बादल्या; पाहा VIDEO

Low Cost Loan: लोन पाहिजे? मग PPF खात्यावर मिळवा स्वस्तात कर्ज! किती रक्कम मिळते? व्याजदर किती? जाणून घ्या संपूर्ण नियम

Latest Marathi News Update : पुण्यात मोठे ट्रॅफिक बदल; पालखी सोहळ्यामुळे निर्णय

कमळीचा मॉडर्न अवतार पाहिलात का? अभिनेत्री विजया बाबरने शेअर केला हटके व्हिडिओ, मरीन ड्राईव्हवर वनपीस घालून...

Dombivli: शिवसेनेच्या नेत्याचा रुग्णालयात धिंगाणा! महिला डॉक्टरसह नर्सला मारहाण; कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन, काय घडलं?

SCROLL FOR NEXT