

Manipur Bomb Blast Near Congress MLA’s Residence
esakal
Manipur Bomb Blast Near Congress MLA’s Residence : मणिपूरमध्ये काँग्रेसचे आमदार आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे (CLP) नेते केइशम मेघचंद्र सिंह यांच्या निवासस्थानाजवळ बॉम्बस्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. ३ सप्टेंबर रोजी रात्री सव्वाआठच्या सुमारास थौबल जिल्ह्यातील यैरीपोक भागात ही घटना घडली. सुदैवाने या स्फोटात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.