पिंपरी-चिंचवड

भक्ती शक्ती परिसरातील पत्राशेडवरील अतिक्रमणविरोधी कारवाई

CD

पिंपरी, ता. १ ः महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने भक्ती-शक्ती चौक ते रावेतकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मोकळ्या भूखंडावरील बेकायदेशीर टपऱ्या व झोपड्यांवर सोमवारी निष्कासनाची मोठी कारवाई केली. या कारवाईत सुमारे १५ हजार ३०० चौरस फुटाचे २५ अनधिकृत पत्राशेड पाडण्यात आले. ज्यात टप-या, झोपड्या, हातगाड्यांचा समावेश आहे. या कारवाईचे नगरसेविका शैलजा मोरे आणि प्रभागातील नागरिकांनी स्वागत केले आहे.

अ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत निगडीतील भक्ती-शक्ती चौक ते रावेत नविन पुलाकडे जाणाऱ्या बीआरटी रस्त्यालगतच्या मोकळ्या भूखंडावर काही दिवसांपासून अतिक्रमण वाढले होते. येथे पत्राशेड, टपऱ्या हातगाड्यांचा सुळसुळाट झाला होता. त्यामुळे परिसरात गुन्हेगारी वाढली होती. वर्दळीचा रस्ता असल्यामुळे नागरिकांना विशेषतः महिलांना येथून ये-जा करताना जीव मुठीत घेऊन जावे लागत असे. याबाबत प्रभागातील ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या बऱ्याच तक्रारी होत्‍या.

अतिक्रमण हटविण्यासाठी नगरसेविका मोरे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले. मोकळ्या भूखंडावरील बेकायदेशीर टपऱ्या व झोपड्यांवर निष्कासनाची कारवाई केली. या जागेवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी तारेचे कुंपण करण्यात यावे अशीही मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नावे चक्क पिवळं रेशनकार्ड, अज्ञातावर गुन्हा दाखल

Pune Metro Expansion : पुणे मेट्रोचा विस्तार २०० किलोमीटरवर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेट्रो भवनचे उद्‍घाटन

CM Devendra Fadnavis : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मे मध्ये धावणार; २३ किलोमीटरच्या मार्गिकेचे दोन टप्प्यांत उद्‍घाटन

Dharashiv Accident: तुळजापूर-लातूर महामार्गावर भीषण अपघात; तीन वाहनांची धडक, एक ठार

Latest Marathi Update : राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT