पिंपरी-चिंचवड

सेवानिवृत्त व स्वेच्छानिवृत्त कर्मचा-यांचा महापौरांच्या हस्ते सत्कार

CD

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा
महापौरांच्या हस्ते सत्कार


पिंपरी, ता. २ ः सेवानिवृत्त होत असलेल्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी अनेक वर्षे निष्ठापूर्वक, सातत्याने आणि सचोटीने कामकाज करुन महापालिकेची सेवा केली आहे, याचा आदर्श कार्यरत कर्मचाऱ्यांनी घ्यावा, असे गौरवोद्गार महापौर उषा ढोरे यांनी व्यक्त केली.
महापालिकेच्यावतीने डिसेंबर आणि जून २०२१ अखेर सेवानिवृत्त व स्वेच्छानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ पार पडला. त्यावेळी महापौर माई ढोरे बोलत होत्या. यावेळी उपमहापौर हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, बाळासाहेब कापसे, गणेश भोसले, तुकाराम गायकवाड, संजय साळवी उपस्थित होते.
डिसेंबर २०२१ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये शल्यचिकित्सक संजय पाडळे, लेखाधिकारी किशोर शिंगे, उपअभियंता अरविंद माळी, कार्यालयीन अधीक्षक निशा आहेर, मुख्य आरोग्य निरीक्षक अभिजित गुमास्ते, असिस्टंट मेट्रन सय्यदा जियाउद्दीन, ए. एन. एम. शामला घोडके, मुख्य लिपिक विनोद शिंदे, उपशिक्षिका प्रतिभा मसणे, रेश्मा वाळेकर, सुरेखा शिरसट, सहायक शिक्षिका गौसिया खान, लिपिक संजय बोधे, हार्टीकल्चर सुपरवायझर चंद्रकांत मोरे, वाहन चालक मन्मथ चव्हाण, रखवालदार तानाजी दाभाडे, दिलीप केदारी, सफाई कामगार कमलिनी लोंढे, सुमन वाघमारे, सफाई सेवक मुन्नीदेवी सौदे यांचा समावेश आहे.
डिसेंबर २०२१ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये कार्यालयीन अधीक्षक लाजवंती चंदीरामाणी, बाळू गंधट, रखवालदार कमलाकर क्षिरसागर, सफाई कामगार जयश्री कांबळे, विमल भुलांडे, कचरा कुली दिलीप गायकवाड यांचा समावेश आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जून २०२१ मध्ये सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी, कर्मचा-यांचा सत्कार समारंभ घेण्यात आला नव्हता. त्याही अधिकारी, कर्मचा-यांचा सत्कार करण्यात आला. माहे जून २०२१ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये सफाई कामगार लक्ष्मी मुरगंडी, भाऊसाहेब बरकडे, करुणा शिंदे, खंडू पोटे, संजू भिंगारे, शांताबाई बांबे, सफाई सेवक मिलिंद डोईफोडे, कचराकुली राजू कदम, गटरकुली रामा मंजाळ, राणू ठोकळ यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 आधीच ‘फ्री पास’ घोटाळा उघड! माजी क्रिकेटरच निघाला मास्टरमाइंड, तिकीटांचा काळाबाजार प्रकरणी पोलिसांकडून अटक

Latest Marathi News Live Update : वर्धा बाजार समितीत गव्हाची वाढली आवक

Weekly Horoscope : 'या' 5 राशींना होणार आदित्य मंगल योगाचा लाभ; करियरमध्ये होणार प्रगती आणि नव्या संधी

Pune University: पुणे विद्यापीठात आर्थिक गैरव्यवहार? 'फॉरेन्सिक ऑडिट'साठी एका महिन्यात निविदा

Gas Shortage: भारताने शोधला होर्मुजला पर्याय! 'या' मार्गाने होतोय मुबलक तेल पुरवठा

SCROLL FOR NEXT