पिंपरी-चिंचवड

कोरोनातही अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली नगरसेवकांचा गोवा आणि पंजाब दौरा

CD

अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली
नगरसेवकांचा गोवा, पंजाब दौरा

पिंपरी, ता. १ः स्थायी समिती, क्रीडा शहर सुधारणा समिती, ‘फ’ क्षेत्रीय समितीनंतर आता ‘ क ’ आणि ‘ ई ’ क्षेत्रीय समितीचे नगरसेवक दौऱ्यावर जाणार आहेत. हे नगरसेवक स्वच्छ भारत अभियानांतर्गत पर्यटनस्थळ अशी ओळख असलेल्या गोव्यातील पणजी व पंजाबमधील चंदीगडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यासाठीच्या खर्चास स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली.

महापालिकेची आगामी निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये होणे अपेक्षित आहे. ओमीक्रॉन, कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे जर निवडणूका लांबणीवर गेल्या. तरी, विद्यमान नगरसेवकांचा कार्यकाल १२ मार्च २०२२ पर्यंत आहे. म्हणजेच केवळ दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली नगरसेवकांनी विविध ठिकाणचे दौरे आयोजित केले आहेत. स्थायी समितीच्या बुधवारी (ता. २९) झालेल्या सभेत ‘ क ’ आणि ‘ ई ’ क्षेत्रीय समिती नगरसेवकांच्या अभ्यास दौऱ्याच्या खर्चाला मान्यता दिली.

महापालिकेचे आठ क्षेत्रीय कार्यालये आहेत. प्रत्येक कार्यालयाच्या हद्दीत १६ नगरसेवक येतात. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत ‘ क ‘ क्षेत्रीय कार्यालयातील नगरसेवक आणि प्रभागातील अधिकाऱ्यांचा पणजी, चंदीगड अभ्यास पाहणी दौरा करण्यास समितीने ९ नोव्हेंबरला ठराव मंजूर केला. ‘ ई ‘ क्षेत्रीय समितीचे नगरसेवक, अधिकाऱ्यांच्या पणजी, चंदीगड दौऱ्याचा ठराव समितीने २७ डिसेंबर २०२१ ला केला. या दौऱ्यासाठीच्या खर्चास स्थायी समितीने ऐनवेळी मान्यता दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: बहिणीचा पुरलेला मृतदेह उकरुन बँकेत आणला; वीस हजारांसाठी गरीब भावाचा संताप, व्हिडीओ व्हायरल

Virat Kohli: किंग कोहलीनं ऑटोगाफच दिला नाही... चिमुकला बॅट आपटत ढसाढसा रडला; Video तुफान व्हायरल

Latest Marathi News Live Update: बुलढाण्यातील खामगाव चौकात प्रशांत आंबी यांचं आंदोलन सुरु

'स्मिता पाटील यांच्या बर्फावरील पार्थिवाचा मी मेकअर करत होतो' आर्टिस्ट म्हणाले, 'तिची शेवटची इच्छा...'

Shivaji Kon Hota : प्रकाशक प्रशांत आंबी बुलढाण्यात स्थानबद्ध, डाव्या चळवळीतील कार्यकर्ते संजय गायकवाड यांच्याविरोधात आक्रमक

SCROLL FOR NEXT