पिंपरी-चिंचवड

महापालिका पुन्हा गजबजली

CD

पिंपरी, ता.३ ः नाताळ आणि वार्षिक सुट्ट्या, रजा संपल्यामुळे कर्मचारी, अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे महापालिका पुन्हा गजबजली. सोमवार हा कामावर येण्याचा पहिलाच दिवस असल्याने अनेक कर्मचाऱ्यांनी आळस झटकत महापालिका आवारात प्रवेश केला, मात्र दिवसभर कामाचा मूड नसल्याच्या चर्चा प्रत्येक विभागात सुरू होत्या. गर्दी झालेल्या विभागामध्ये नगररचना विभागाचा समावेश होता. आचारसंहिता जाहीर होण्याच्या आधी नागरिकांची कामे मार्गी लावण्यासाठी नगरसेवकांची लगबग सुरू झाल्याचे दिसून आले.

कोरोनामुळे नागरिकांनी महापालिकेत न येता ऑनलाइन पद्धतीने तक्रारी टाकण्यास सुरुवात केली. त्यामुळे महापालिकेत होणाऱ्या गर्दीवर आपसूक आळा बसला. तरी काही विभागात नेहमीप्रमाणे गर्दी होती. अत्यावश्यक सेवा बजावणारे कर्मचारी कामावर नियमीत होते. सणानिमित्त कर्मचारी व अधिकारी सुटीनिमित्त बाहेर गेल्याने महापालिकेच्या आवारात शांतता निर्माण झाली होती. आता सुट्या संपल्याने महापालिकेचे कामकाज सुरू झाले आहे. सोमवारी कामावर येणाऱ्यांमध्ये पुरुष कर्मचाऱ्यांची संख्या जास्त होती. अनेक विभागातील महिला कर्मचारी मात्र अद्याप कामावर रुजू झाल्या नसल्याचे दृष्य होते. गर्दी झालेल्या विभागामध्ये नगररचना विभागाचा समावेश होता. याठिकाणी रखडलेली कामे करण्यासाठी अनेक मंडळी आली होती. त्याचप्रमाणे काही सेवानिवृत्त नागरिक पेन्शनच्या कामासाठी आले होते. शिक्षण विभागात देखील तुरळक गर्दी दिसून आली.

महासंघाच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांची गर्दी
महापालिका कर्मचारी महासंघाची २१ जानेवारीला निवडणूक होत आहे. इच्छुकांना अर्ज भरण्यासाठी सोमवारी महापालिकेच्या तळमजल्यावर कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले होते. एकाच वेळी सर्व कर्मचारी एकत्र आल्याने महापालिकेत गर्दी झाली होती. त्यामुळे ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळण्याच्या प्रयत्नांना हरताळ फासला गेल्याचे पाहायला मिळाले. या प्रक्रियेदरम्यान अनेक जणांच्या तोंडावरील मास्क, रुमाल गळ्यात अडकलेला होता. कर्मचाऱ्यांना एकाच वेळी बोलावण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने बोलावून गर्दी रोखता आली असती. पण नियोजन नसल्याने ही गर्दी झाली, पर्यायाने धोका पत्करल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai : नवी मुंबईत निवडणूक आणि नववर्ष जल्लोषाची धामधूम; पोलिसांसमोर बंदोबस्ताचे आव्हान

प्राजक्ता माळी बिग बॉसमध्ये जाणार? चाहत्यांच्या प्रश्नावर स्पष्टच बोलली, लग्नाबद्दल बोलताना म्हणाली...

Best Shares to Buy: एका वर्षात मालामाल करू शकतात हे शेअर्स! तज्ज्ञांची फेव्हरेट लिस्ट समोर; जाणून घ्या डिटेल्स

Pune News: ..अखेर बिबट मादी जेरबंद; चार दिवस पिंजऱ्याला हुलकावणी, आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी साेडला सुटकेचा श्वास!

Latest Marathi News Live Update : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात भाजपच्या महत्त्वाच्या बैठका सुरू

SCROLL FOR NEXT