पिंपरी-चिंचवड

महापालिकेची सर्वसाधारण सभा ऑनलाईन होणार

CD

पिंपरी, ता. ३ ः महापालिकेची जानेवारी महिन्याची सर्वसाधारण सभा ऑनलाइन होणार आहे. ओमीक्रॉनमुळे कोरोना संक्रमणाची संख्या झपाट्याने वाढत असल्याने महापालिकेच्या सर्व सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, ऑनलाइन पद्धतीनेच घेण्यात याव्यात, असा आदेश नगरविकास विभागाने दिला आहे. त्यानुसार ही सभा ऑनलाइन होणार आहे.

आता राज्यात पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. महानगरांमध्ये ओमीक्रॉनमुळे बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शासनाने याची गंभीर दखल घेतली असून मोठ्या प्रमाणावरील एकत्रीकरण टाळण्यासाठी निर्बंध विहित केले आहेत. सद्यःस्थितीत कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असल्याने महापालिकांच्या सर्व बंधनकारक सभा, बैठका ऑनलाइन घ्याव्यात. महासभा, स्थायी समिती व इतर सर्व वैधानिक समित्यांच्या सर्व बंधनकारक बैठका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, ऑनलाइन पद्धतीनेच घेण्यात याव्यात. राज्यातील कोरोना संक्रमण परिस्थितीचा आढावा, एक महिन्यानंतर वस्तुस्थिती व तपशिलाच्या आधार घेऊन या संदर्भातील पुढील निर्णय कळविण्यात येईल असे शासनाने स्पष्ट केले आहे.

याबाबत नगरसचिव उल्हास जगताप म्हणाले, ‘‘कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे राज्य सरकारने सर्व सभा ऑनलाइन घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सर्व सभा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जातील.’’
-------
तर ठरेल अखेरची सभा
पंचवार्षिक निवडणूक मार्चमध्ये होईल असे मानले जात असल्याने ही सभा अखेरची ठरेल. कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेत महापालिकेच्या सभा ऑनलाइनच होत होत्या. परंतु, कोरोनाची रुग्ण संख्या आटोक्यात आल्याने राज्य शासनाने २२ ऑक्टोबर २०२१ रोजी सभा ऑफलाइन पद्धतीने घेण्याची परवानगी दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठी 'खेळी'! ठाकरे गटातील खासदार शिंदेसेनेत येणार? एकनाथ शिंदेंची दिल्लीत गुप्त रणनीती

सुरज चव्हाण होणार बाबा? बायकोच्या 'त्या' पोस्टने वेधलं सगळ्यांचं लक्ष, Viral Video

120000000000! राजस्थान रॉयल्स फ्रँचायझी विकणे आहे; भारताची मोठी कंपनी तगडी रक्कम मोजून बनणार मालक, ४ स्पर्धक शर्यतीत

Latest Marathi News Live Update : पंढरपूर येथील सांगोला पेपर चोरी प्रकरण; दोन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Pune Rain: पुण्यात पावसाला सुरुवात! कोथरुड, बाणेर भागात ढगांचा गडगडाट; हवामान विभागाचा अलर्ट

SCROLL FOR NEXT