पिंपरी-चिंचवड

व्हिडिओ गेम पार्लरवर छापा; दोघांवर गुन्हा

CD

पिंपरी, ता. ४ : व्हिडिओ गेम मशीनवरील आकड्यावर पैसे लावून जुगार सुरू असलेल्या, गेम पार्लरवर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने छापा टाकला. यामध्ये दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
व्हिडिओ गेम चालक गणेश बालाजी धनेराव (वय २६, रा. गणेशनगर, एकता कॉलनी, वाकड) , जुगार खेळणारा समीर दामोदर मानकर (वय ३८, रा. सुदर्शन कॉलनी, कैलासनगर, थेरगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. डांगे चौकातील वाकड रोड येथील भोईर इस्टेट येथे रॉयल व्हिडिओ गेम पार्लरमध्ये अवैधरीत्या गिऱ्हाईकांना मास्टर, मेगा फ्री प्ले, विन या व्हिडिओ गेम मशीनवरील आकड्यावर पैसे लावण्यास सांगून जुगार खेळवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांना छापा टाकून चार हजार ६०० रुपयांची रोकड व पन्नास हजार रुपये किमतीच्या पाच व्हिडिओ गेम मशिन जप्त केल्या. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price: अमेरिकेतलं १२९ टन सोनं माघारी आणलंच नाही..! एका निर्णयाने फ्रान्सची सेंट्रल बँक तोट्यातून थेट नफ्यात

IPL 2026 New Rule: आयपीएलने खेळाडूंसाठी आणला नवा नियम! ज्याचं नाव, त्यालाच परवानगी... नव्या नियमाने फ्रँचायझींमध्ये गोंधळ

Latest Marathi News Live Update: मीरा-भाईंदर परिसरातील कचरा आणि मातीचं मिश्रण मुंबईत टाकल्याचा प्रकार

Kirit Somaiya journalists clash : किरीट सोमय्यांची पत्रकारांना थेट दमदाटी, प्रश्न विचारताच भडकले; मुंबईतील घटनेने खळबळ

Pune Politics: खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते–भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची पुण्यात तासभर चर्चा; भाजप प्रवेशाच्या चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT