पिंपरी-चिंचवड

पिंपरीतील शिबिरात ७१ जणांचे रक्तदान

CD

पिंपरी, ता. ६ : पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना आणि डॉ. डी. वाय. पाटील रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. २२ डिसेंबरला शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
उदघाटन प्रसंगी डॉ. डी. वाय. पाटील रक्तपेढीच्या समन्वयक डॉ. निलीमा मोरे, शुभम शिंदे व टीममधील सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. रणजित पाटील यांनी रक्तदान शिबिराचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. रक्तपेढीच्या समन्वयक डॉ. निलीमा यांनी रक्तपेढीच्या कार्यपद्धतीची ओळख करून देऊन सर्व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांना रक्तदानासाठी प्रोत्साहित केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. गोकूळ जाधव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील व सचिव सोमनाथ पाटील, विश्वस्त स्मिता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे प्राचार्य आणि राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी यांनी संयोजन केले. शिबिरामध्ये ६१ विद्यार्थी आणि १० कर्मचारी असे ७१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये ५६ पुरुष आणि १५ महिला सहभागी झाल्या. राष्ट्रीय सेवा योजनेत १५० स्वयंसेवक, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी सहभागी झाले होते. गोकूळ जाधव यांनी सर्व सहभागी मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Wage Limit Hike : कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! ईपीएफओची वेतन मर्यादा वाढली; ५१ लाखांहून अधिक जणांना फायदा

Satara Crime : साताऱ्यात दोन गटात हाणामारी, तणावाचे वातावरण; शेवटी २ मंडळांचे केले गणेश विसर्जन, १४ जणांवर गुन्हा दाखल

Team India Update: वरुण चक्रवर्तीच्या जागी आशियाई स्पर्धेसाठी DC चा ऑल राऊंडर; IND vs WI मालिकेत हार्दिक पांड्याचे खेळणे अवघड

मुंबई-नाशिक हायवेवर अपघात, एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू, देवदर्शनाहून परतताना २ वर्षांपूर्वी जळालेल्या ट्रकला गाडीची धडक

Marathi News Live Updates : यमुना नदी आणि इतर जलस्रोतांमध्ये मूर्ती विसर्जनास मनाई

SCROLL FOR NEXT