पिंपरी-चिंचवड

लशीच्या प्रमाणपत्राची वाहकांसाठी डोकेदुखी गर्दीच्या वेळी अंमलबजावणी करणे अवघड

CD

पुणे, ता. २४ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पीएमपीने प्रवाशांना कोरोना लशीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक केले आहे. परंतु, हा नियम आता वाहकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

पीएमपीने प्रवास करण्यासाठी नागरिकांना आत कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र वाहकांना दाखवावे लागत आहे. प्रशासनाने याबाबत परिपत्रक काढून त्याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु गर्दीच्या वेळेस प्रवाशांचे टिकीट काढायचे की प्रमाणपत्र पाहायचे, असा सवाल वाहकांकडून उपस्थित केला जात आहे.

प्रवासी बसमध्ये बसताना प्रमाणपत्र असल्याचे सांगतात; पण प्रत्यक्षात प्रमाणपत्र दाखवण्याची विनंती केल्यानंतर घरी राहीले, विसरलो, असे वेगवेगळी कारणे त्यांच्याकडून सांगण्यात येतात. प्रमाणपत्र नसलेल्या प्रवाशांना बसमधून उतरण्यास सांगितले असता ते वाद घालत असल्याचे वाहक दीपक वैरागे यांनी सांगितले. यामुळे प्रशासनाने गर्दीच्या मार्गावरील प्रमुख स्थानकांवर कोविड पथकाची नेमणूक करण्याची मागणी वाहनांकडून होत आहे.

प्रवाशांकडे युनिव्हर्सल पास मागितला असता तो दाखवण्यासाठी वेळ जातो. यामुळे गर्दीच्या वेळेत सर्वांचे पास तपासणे शक्य होत नाही.
-दीपक गायकवाड, वाहक, पीएमपी

सर्वच ठिकाणी प्रवासादरम्यान सरकारने युनिव्हर्सल पास, मास्क वापरणे बंधनकारक केले असून प्रवाशांनी वाहकांना सहकार्य करावे. गर्दीच्या मार्गांवर प्रमुख स्थानकावर कोविड पथकांची नेमणूक होणे आवश्यक आहे.
- संतोष शिंदे, राष्ट्रवादी कामगार युनियन
------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT