पिंपरी-चिंचवड

महावितरणचा सावळा गोंधळ थांबवा - राजेंद्र जगताप

CD

जुनी सांगवी, ता. ८ ः पिंपळे गुरव व परिसरात अनियमित व वाढीव वीजबिले याचा फटका नागरीकांना बसत आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. महावितरणच्या या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करीत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नागरीकांना त्रास देणे थांबवावे, अन्यथा महावितरण कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी दिला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून परिसरातील नागरीकांना वाढीव वीजबिले येत आहेत. दर महिन्याचे मीटर रीडिंग घेऊन, पुढील तीन चार महिन्याची बिले अंदाजे काढण्यात येत असल्याने, नागरिकांमधून संताप संताप व्यक्त केला जात आहे. अनेकदा ही वाढीव बिले भरूनही महावितरणकडून वीज तोडली जाते. याबाबत महावितरणच्या कर्मचाऱ्यांना विचारले असता, ते सांगतात की वीज बिल न भरलेल्या नागरिकांच्या यादीत नाव असल्याने वीज तोडावी लागत आहे. मात्र, त्याचवेळी नागरिक वीजबिल भरल्याची पावती सादर करूनही महावितरणचे अधिकारी, कर्मचारी ऐकत नसल्याची वस्तुस्थिती आहे.
वीजबिल भरूनही नागरिकांच्या माथी भुर्दंड मारला जात असल्याचे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी सांगितले. अनेकदा नागरीकांना जादा आलेली वीजबिले महावितरण कार्यालयात कमी करून दिली जातात. महावितरणची चूकच नसेल, तर बिले कमी करून कशी काय दिली जातात याचबरोबर नविन मिटरसाठी रीतसर अर्ज करूनही मिटर मिळत नाहीत. याउलट एजंटकडून मिटर जादा दराने उपलब्ध होतात. यावर अधिकारी कर्मचाऱ्यांना वरदहस्त आहे. असा आरोपही राजेंद्र जगताप यांनी केला आहे. महावितरणच्या सावळ्या गोंधळाबाबत आपण ऊर्जामंत्री नितीन राऊत, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच महावितरणच्या रास्ता पेठ येथील कार्यालयाला निवेदन देणार असल्याचेही राजेंद्र जगताप यांनी सांगितले.

‘‘ सांगवी विभागात जवळपास साडेतीन कोटी रुपये थकबाकी आहे. महावितरणाला नियमित वीजबिल भरून नागरिक ग्राहकांनी सहकार्य करावे. थकीत वीजग्राहक कारवाई ही महावितरण विभागाकडून केली जाते. मात्र कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते.’’
- आर.एम. काळे, अभियंता, सांगवी विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonam Shinde Death : कोल्हापुरात खराब रस्त्याने घेतला कर्त्या महिलेचा जीव; मोपेड घसरून पडल्यानंतर डंपरच्या चाकाखाली चिरडले डोके, मुलगी जखमी

IND vs JPN, T20I: भारत-जपानमधील ऐतिहासिक क्रिकेट सामन्यावर पडणार पावसाचं पाणी? नव्या ठिकाणी खेळण्यास टीम इंडिया सज्ज

Kerala Rain: केरळममध्ये पावसाचा हाहाकार; सहा जण वाहून गेले, पाच जणांचे मृतदेह सापडले

Pandharpur Murder: ५५ वर्षीय प्रेयसीने केला ७० वर्षीय प्रियकराचा खून; पंढरपुरातील खळबळजनक घटना; दीड महिन्यानंतर उलगडले खुनाचे रहस्य

Rahul Bondre BJP Entry Cancelled : राहुल गांधींचा एक कॉल प्रोब्लेम सॉल्व! राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश रद्द; गांधींनी कॉलवर काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT