पिंपरी-चिंचवड

लस न घेतलेल्यांचे प्रमाण अधिक

CD

संसर्ग नेमका कोणाला?
गेल्या सहा दिवसांपासून शहरात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यात कोरोना प्रतिबंधक लस न घेतलेले व एकच डोस घेतलेल्यांचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर संसर्ग झालेल्यांमध्ये नेमका कोणत्या व्यक्तींचा समावेश अधिक आहे, याचा शोध घेण्यासाठी तपासणी करताना अर्थात ॲंटिजेन किंवा आरटीपीसीआर टेस्ट करतानाच लस घेतली आहे किंवा नाही, घेतली असल्यास एक डोस झाला आहे की दोन्ही डोस, कोणती लस घेतली आहे, याची नोंद शुक्रवारपासून (ता. ७) तपासणी केंद्रांद्वारे केली जाणार आहे. यामुळे संसर्गाची नेमकी वस्तुस्थिती कळणार आहे.

डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले....
- कोरोना व ओमिक्रॉनची लक्षणे एकच आहेत
- डेल्टा प्लसपेक्षा ओमिक्रॉनचा त्रास कमी, परंतु संसर्गाची वाढ झपाट्याने होत आहे
- संसर्ग टाळण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग व सॅनिटायझर किंवा हात धुणे गरजेचे
- संसर्ग झालेल्यांमध्ये लस न घेतलेल्यांचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता आहे
- रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण कमी आहे
- संसर्गाचा त्रास कमी होण्यासाठी लस घेणे आवश्यक आहे

अशी होते तपासणी
ॲंटिजेन व आरटीपीसीआर चाचणीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या घशातील व नाकातील द्रवांचे नमुने घेतले जातात. ॲंटिजेन चाचणीचा रिपोर्ट त्वरीत मिळतो. मात्र, आरटीपीसीआर चाचणीचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे तपासणीसाठी पाठवले जातात. त्यांच्या तपासणीत कोरोना संसर्गाचा रिपोर्ट दोन किंवा तीन दिवसांत मिळतो. त्याच नमुन्यांद्वारे ओमिक्रॉन संसर्गाबाबत तपासणी केली जाते. मात्र, त्याचा रिपोर्ट येण्यासाठी पाच ते सहा दिवस लागत आहेत.

तीन दिवसांत ८४११ मुलांनी घेतली लस
शहरातील १५ ते १८ वयोगटातील मुलांना चार फेब्रुवारीपासून कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. त्यास चांगला प्रतिसाद मिळत असून पालकही पुढाकार घेत आहेत. गेल्या तीन दिवसांत अर्थात सहा फेब्रुवारीपर्यंत आठ हजार ४११ मुलांना लस देण्यात आली आहे. त्याचा कोणालाही त्रास झालेला नाही. लस घेतल्यानंतर त्रास झाला अशी कोणतीही तक्रार अद्याप प्रशासनाकडे आलेली नाही. एक लाख २५ हजार मुलांना डोस देण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे, असे डॉ. गोफणे यांनी सांगितले.

असे झाले मुलांचे लसीकरण
तारीख / डोस
४ / २१८७
५ / ३३६५
६ / २८५९
एकूण / ८४११

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: धोनीच्या CSK ला काव्या मारनने कोर्टात खेचले; आयपीएलपूर्वी वातावरण तापले, नेमकी भानगड काय?

Latest Marathi News Live Update : पुणे दहावी पेपरफुटी प्रकरण, पोलीस तपासात पेपर फुटला नसल्याचे समोर

Ali Jafari Iran strategy: अली जाफरी कोण आहेत? इराणची कडवी झुंज! अमेरिका-इस्रायलसारख्या महाशक्तींचा विजय का अशक्य ठरतोय?

Supreme Court on Menstrual Leave : ...तर महिलांच्या करिअरवर परिणाम; मासिक पाळीच्या रजेबाबत सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

'मला इच्छा आहे परंतु मी प्रेग्नेट नाही' नीना गुप्ता यांचा खुलासा, म्हणाल्या...'गोड बातमी असावी असं वाटतं पण...'

SCROLL FOR NEXT