पिंपरी-चिंचवड

गुन्हे वृत्त

CD

तडीपार गुन्हेगाराची पोलिसांना
वाल्हेकरवाडीत धक्काबुक्की

पिंपरी : दोन वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेला आरोपी पोलिसांची परवानगी न घेता शहरात आला. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना त्याने दमदाटी करीत धक्काबुक्की केली. ही घटना चिंचवड, वाल्हेकरवाडी रोड येथे घडली. वीरेंद्र ऊर्फ बेंद्या भोलेनाथ सोनी (वय २३, रा. वाल्हेकरवाडी रोड, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई गोविंद डोके यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी वीरेंद्र याला २०२१ मध्ये पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केले आहे. तो तडीपार आदेशाचा भंग करून तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी पोलिसांची परवानगी न घेता शहरात आला. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता रविवारी (ता. २०) रात्री सव्वादहाच्या सुमारास त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी पोलिस गेले. त्यावेळी त्याने पोलिस शिपाई गोविंद डोके यांना धक्काबुक्की केली. दोन्ही हाताने ढकलून मला कोण पकडते, असे म्हणत आरडाओरडा करीत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. चिंचवड पोलिस अधिक तपास करीत आहेत.


दिघीत बहिणीच्या पतीला कोयत्याने मारहाण
बहिणीशी लग्न केल्याच्या कारणावरून भावाने बहिणीच्या पतीला कोयत्याने मारहाण केली. तसेच त्याच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीलाही मारहाण केली. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दिघीतील मॅगझीन चौक येथे घडली. या प्रकरणी शुभम नवनाथ बरकडे ( रा. लिंब, सातारा) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहित भोसले (वय २४), गणेश भोसले (वय २३, दोघे रा. अपशिंगे, ता. कोरेगाव, जि. सातारा) व त्यांच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी बरकडे, त्यांची पत्नी व मित्र मंगेश खंडझोडे हे रिक्षातून स्वारगेट येथे जात होते. ते दिघी येथील मॅगझीन चौकात आले असता आरोपी मोटारीतून आले. बरकडे जात असलेल्या रिक्षासमोर मोटार आडवी लावून त्यांना अडवले. त्यानंतर आरोपींनी मंगेश यांना रिक्षातून बाहेर ओढून मारहाण केली. दरम्यान, आरोपी रोहित याने त्याची बहीण ऋतुजा व बरकडे यांनी लग्न केल्याच्या कारणावरून त्यांना कोयत्याने मारून जखमी केले. तसेच ऋतुजाला मोटारीत बसवून घेऊन गेले. दिघी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

पिंपळे गुरवमध्ये महिलेची पर्स हिसकावली
मॉर्निंग वॉक करीत असलेल्या महिलेची पर्स चोरट्यांनी हिसकावली. त्यामध्ये २५ हजार रुपये होते. ही घटना पिंपळे गुरव येथील विद्यासागर येथे घडली. या प्रकरणी नलिनी दिनेश पाटील (रा. विद्यानगर, पिंपळे-गुरव) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी नलिनी पाटील रविवारी (ता.२०) सकाळी साडेसहाच्या सुमारास विद्यानगर पिंपळे-गुरव येथील सूर्यनगरी अपार्टमेंटमध्ये मॉर्निंग वॉक करत होत्या. त्यावेळी एका दुचाकीवरून दोन चोरटे आले. त्यांनी पाटील यांच्या हातातील पर्स हिसकावून नेली. त्यामध्ये पाटील यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड व २५ हजाराची रोकड होती. सांगवी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT