पिंपरी-चिंचवड

सर्व क्षेत्रीय कार्यालयात आज जनसवांद सभा

CD

पिंपरी, ता. २४ : शहरातील नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी, तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी महापालिकेच्या सर्व आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये (ता. २५) सोमवारी सकाळी १० ते १२ या वेळेत जनसंवाद सभा होणार आहे.

प्रशासकीय निर्णयांमध्ये तसेच होणाऱ्या विकासकामांमध्ये नागरिकांच्या आकांक्षांचे प्रतिबिंब उमटावे, यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय दर सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्याचा निर्णय प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी घेतला. याकरिता महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय मुख्य समन्वय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये, ‘अ’ क्षेत्रिय कार्यालय - सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, ‘ब’ क्षेत्रिय कार्यालय - बांधकाम परवानगी शहर अभियंता मकरंद निकम, ‘क’ क्षेत्रिय कार्यालय - भूमी आणि जिंदगी सहायक आयुक्त प्रशांत जोशी, ‘ड’ क्षेत्रिय कार्यालय - नागरवस्ती उपआयुक्त अजय चारठणकर, ‘इ’ क्षेत्रिय कार्यालय - सह शहर अभियंता सतीश इंगळे, ‘फ’ क्षेत्रिय कार्यालय - प्र. अतिरिक्त आयुक्त (३) उल्हास जगताप, ‘ग’ क्षेत्रिय कार्यालय - उपआयुक्त तथा प्र. कायदा सल्लागार चंद्रकांत इंदलकर, ‘ह’ क्षेत्रिय कार्यालय - पर्यावरण विभाग सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मुख्य समन्वय अधिकारी हे जनसंवाद सभेसाठी आलेल्या प्रत्येक नागरिकांची तक्रार नोंदवून घेऊन शक्य असल्यास तिथेच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तक्रारींचे निराकरण करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Series: अजित आगरकर OUT, न्यूझीलंड दौऱ्यासाठी रोहित शर्माचा खास 'माणूस' निवडणार संघ; मीटिंग कधी होणार?

'दृश्यम ३' मध्ये गायतोंडेची दहशत दिसलीच नाही' म्हणणाऱ्या मराठी अभिनेत्याला नेटकऱ्यांनी सुनावलं; म्हणाले- तुम्ही लोक

Navi Mumbai: नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद, सात विभागांवर परिणाम; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Dapoli Projects,: तीन प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा; दाभोळ अणुऊर्जा, चिखलगाव बॉक्साइट व देवके नवेनगर प्रकल्प रद्द करण्याची मागणी!

Latest Marathi News Live Update : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुण्याच्या दिशेने रवाना

SCROLL FOR NEXT