पिंपरी-चिंचवड

जीवनावश्‍यक साहित्याचा रेशनदुकानांना पुरवठा करा तमिळनाडूच्या धर्तीवर शिधापत्रिकाधारकांची मागणी

CD

पिंपरी, ता. ८ ः तमिळनाडूच्या धर्तीवर रेशनदुकानांना जीवनावश्यक साहित्याचा पुरवठा करा, अशी मागणी आता शिधापत्रिकाधारक करू लागले आहेत.
पिंपरी चिंचवडसह राज्यातील मोठ्या औद्योगिक शहरातील गोरगरीब रेशनकार्डधारकांना पुढील तीन महिन्यासाठी अन्नधान्याबरोबर ६ किलो साखर, ३ किलो डाळी, ६ लिटर खाद्यतेल वितरण करावे. तमिळनाडू सरकारने नुकतेच राज्यातील २५ लाख असंघटित जनतेसाठी तेल, तुपासह सर्व जीवनावश्यक वस्तू देण्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. घरेलू कामगार, रिक्षाचालक, पथारी, किरकोळविक्रेते या वर्गाचे खात्रीशीर उत्पन्न गेल्या दोन वर्षात सरासरी पाच हजार रुपये इतके घसरले आहे. महागाई ४० टक्क्यांनी वाढलेली आहे. मागील दोन वर्षातील महामारीमुळे तमिळनाडू, केरळ, छत्तीसगड, मध्यप्रदेश सरकारने आर्थिक नुकसान सहन करत राज्यातील जनतेच्या कुपोषण मुक्तीसाठी कल्याणकारी रेशनिंग व्यवस्था राबवली आहे. महाराष्ट्रातील आघाडी सरकारने आता कल्याणकारी राज्याच्या संकल्पना राबवायला वेळ खर्च करावा. नव्या वर्षात अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी अंदाजपत्रकात रेशनवर सर्व जीवनावश्यक वस्तू अतिशय माफक दरात वितरित करण्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT