पिंपरी-चिंचवड

देहूत रंगणार आता तिरंगी लढत

CD

देहू, ता. १० ः देहू नगर पंचायतीची उर्वरित चार प्रभागांतील चार जागांसाठी १८ जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. सोमवारी (ता. १०) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सहापैकी चार अपक्षांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.
देहूत सतरा जागांपैकी तेरा जागांसाठी गेल्या महिन्यात २१ डिसेंबर रोजी निवडणूक झाली. चार प्रभागांतील ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे चार जागांची निवडणूक १८ जानेवारी होत आहे. त्यानुसार चार प्रभागांतून एकूण १८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
प्रभाग निहाय उमेदवार नावे आणि पक्ष ः प्रभाग क्रमांक ११ः पौर्णिमा परदेशी (राष्ट्रवादी), अनिता मोरे(भाजप). प्रभाग क्रमांक १२ः सपना मोरे (राष्ट्रवादी), सिंधू मोरे(भाजप), रेश्मा मोरे (अपक्ष). प्रभाग क्रमांक १४ः प्रवीण काळोखे (राष्ट्रवादी), संजय जंबूकर(भाजप), सुनील हगवणे (शिवसेना), आनंदा काळोखे(अपक्ष), नीता चव्हाण (अपक्ष). प्रभाग क्रमांक १५ः आदित्य टिळेकर(राष्ट्रवादी), प्रफुल्ल टिळेकर (भाजप).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT