पिंपरी-चिंचवड

६२ कॅटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील वाहन प्रवेशकर रद्द

CD

देहूरोड, ता. १० ः संरक्षण विभागाने देशातील ६२ कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील वाहन प्रवेशकर रद्द करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाने पुणे-मुंबई महामार्ग आणि देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गावरील वाहन प्रवेश कर स्वीकारणारे नाके बंद केले आहे. जकात विभागानंतर वाहन प्रवेश कर बंद झाल्याने, देहूरोड कँटोन्मेंट बोर्ड प्रशासनापुढे मोठे आर्थिक संकट उभे राहणार आहे.
संरक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रकामध्ये वाहन प्रवेशकर तत्काळ बंद करण्यास सांगितले आहे. कँटोन्मेंट बोर्डाच्या वतीने महामार्गावर नाके लावून वाहन चालकांकडून प्रवेश शुल्क वसूल करणे, हे सरकारच्या वस्तू आणि वाहतुकीच्या उपक्रमाला अनुसरून नाही. तसेच राहणीमान आणि व्यवसाय सुलभ करण्याच्या प्रयत्नांना अडथळा निर्माण करत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले आहे.
याबाबत देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाचे कार्यालयीन अधिक्षक राजन सावंत यांनी सांगितले,‘‘संरक्षण विभागाने दिलेल्या आदेशाचे पालन रविवार(ता.९)पासून करण्यात आले आहे. बोर्डाने वाहन प्रवेश कर घेणे बंद केले आहे.’’

‘‘या अगोदर जीएसटीमुळे जकात बंद झाली. तसेच वाहन प्रवेशकर वसुली बंद झाल्याने बोर्डावर आर्थिक संकट आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार होवू शकणार नाहीत. तसेच निधी नसल्याने विकास कामे बंद पडणार आहे. त्यामुळे नागरिकरण झालेल्या विभागाचे जवळील महापालिकेत समावेश करावा, अथवा स्वतंत्र नगरपंचायत होण्यास परवानगी द्यावी.’’
- रघुवीर शेलार, बोर्डाचे माजी उपाध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT