पिंपरी-चिंचवड

प्रभात रस्ता परिसरातील नागरिक-पोलिसांची बैठक

CD

पुणे, ता. ११ : प्रभात रस्ता परिसरात सातत्याने होणाऱ्या घरफोड्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. अशा घटना रोखण्यासाठी व नागरिकांमध्ये सुरक्षितता निर्माण व्हावी, यासाठी आता पोलिसांना नागरिकांची खंबीर साथ मिळणार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरीकांनी डेक्कन पोलिसांशी चर्चा करून याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
प्रभात रस्ता परिसरात बंगले, मोठमोठ्या सोसायट्या आहेत. याच परिसरात मागील काही दिवसांपासून घरफोडीच्या घटना सातत्याने घडू लागल्या आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याविषयी नागरीकांनी नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे यांच्याकडे आपली समस्या मांडली. त्यानंतर एकबोटे, प्रभात रस्ता परिसरात राहणारे ज्येष्ठ नागरिक, विविध गृहनिर्माण सोसायट्यांच्या प्रतिनिधींनी डेक्कन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुरलीधर करपे यांची भेट घेतली. त्यावेळी या प्रश्‍नाबाबत करपे, एकबोटे व नागरिकांची बैठक झाली.
या बैठकीमध्ये घरफोड्यांच्या घटना करणाऱ्या गुन्हेगारांना तत्काळ पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, रात्रीच्यावेळी पोलिसांची गस्त वाढवावी, अशा रहिवाशांच्या मागण्या एकबोटे यांनी पोलिसांसमोर मांडल्या. या मागण्या तत्काळ मान्य करून करपे यांनी रात्र गस्त वाढविण्याबरोबरच नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची सुरक्षा अधिक मजबूत करू, असे आश्‍वासन दिले. तसेच ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी करून त्यांनाही आवश्‍यक ती मदत वेळेत पोचवू असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'आम्ही १५ वर्षांचे असताना असे नव्हतो...' Vaibhav Sooryavanshi बद्दल अभिषेक शर्मा नेमकं काय म्हणाला?

Gangapur News : अल्पवयीन पीडितेवर अत्याचार प्रकरणात आरोपीला ७ वर्षे सश्रम कारावास; गंगापूर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

विजय साळगावकर सुटलाच नसता, 'दृश्यम ३' मध्ये सगळ्यात मोठी चूक; पोलिसांनी दुर्लक्षित केली ती गोष्ट, तुम्हाला कळली का?

Wani News : दिंडोरीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रास्ता रोको; शेतकरी, आदिवासी व नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन, दुष्काळी यादीत तालुक्याचा समावेश करण्याची मागणी

FlyDubai Co-Pilot Case : इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा कट; फ्लाईदुबईच्या को-पायलटला होणार 'फायरिंग स्क्वॉड'द्वारे मृत्युदंड?

SCROLL FOR NEXT