पिंपरी-चिंचवड

महापालिकेचे केवळ चौदा विद्यार्थी ठरले शिष्यवृत्तीधारक

CD

पिंपरी, ता. ८ ः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी (ता. ७) जाहीर झाला. त्यात महापालिकेच्या शाळांमधून पाचवी आणि आठवीचे असे एकूण १४ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.
शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल नोव्हेंबरमध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानंतर एक महिना उलटूनही अंतिम निकाल प्रसिद्ध होत नसल्याने विद्यार्थी आणि पालकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर शुक्रवारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाइटवर निकाल जाहीर करण्यात आली.
महापालिकेच्या शाळांमधील पाचवीच्या वर्गामधून ३ हजार ८१८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ३ हजार २०२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून ८६५ विद्यार्थी पात्र ठरले तर १२ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. पाचवीमधून महापालिकेच्या पिंपळे गुरव प्राथमिक शाळेमधून मृणाली प्रमोद सकपाळ या विद्यार्थिनीने ८८.६६ टक्‍के गुण प्राप्त करत मनपा शाळेतून प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर नैतिक रवी ठाकरे हिने ८३.३३ टक्‍के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक मिळविला आहे.
इयत्ता८ वी च्या वर्गांमधून ३ हजार १३९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले. त्यातून १ हजार ८१२ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी केवळ २ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. राहटणी येथील कन्या शाळा क्रमांक ५५ मधील संजना राजेंद्र मांगवडे हिने ७८ टक्‍के गुण मिळवीत महापालिका शाळेतून प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर मोशी कन्या प्राथमिक शाळेतील नंदिनी रमेश भालेकर हिने ७०.६६द्वितीय क्रमांक मिळविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Transaction Charges: 2000 रुपयांपेक्षा अधिकच्या यूपीआय व्यवहारांवर 0.4 टक्के टॅक्स; 'या' ग्राहकांसाठी मात्र UPI सेवा मोफत

''तर तोंड काळं करायची वेळी आली असती'', राज ठाकरेंच्या 'त्या' टीकेला CM फडणवीसांनी दिलं प्रत्युत्तर...

IND vs AFG 2nd T20I: 'Toss' चा 'BOSS'! श्रेयस अय्यरने नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; वरूण चक्रवर्तीला नेमकं काय झालं? BCCI म्हणते...

Pune News : पुण्याच्या चारीही दिशांना स्वतंत्र डंबर प्लांट उभारा; महापौर नागपुरे यांचे आयुक्तांना पत्र

Hingoli News : चोंडीत शक्तिपीठ महामार्गाची मोजणी रोखली! ‘जमीन गेली तर जगायचे कसे?’ वृद्ध महिला शेतकऱ्यांचा आक्रोश; तुषार जाधव यांचा पालकमंत्र्यांना थेट इशारा

SCROLL FOR NEXT