पिंपरी-चिंचवड

गृहविलगीकरणातही डॉक्टरांची नजर

CD

पिंपरी, ता. ११ ः माझी ॲटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. डॉक्टरांनी मला रुग्णालयात दाखल करण्याऐवजी गृहविलगीकरणाची शिफारस केली आहे. औषधे दिली आहेत. पण, घरी आई-वडील आहेत. त्यांचे वय ७० पेक्षा अधिक आहे. त्यांना मधुमेह व रक्तदाबाचा त्रास आहे. दोन खोल्यांचे घर आहे. त्यात मी राहिल्यास आई-वडिलांनाही संसर्ग होऊ शकतो. मग, मी कुठे राहू? असा सवाल ४५ वर्षीय व्यक्तीने उपस्थित केला. असेच प्रश्न लक्षणे नसलेल्या वा सौम्य लक्षणे असलेल्या अनेक रुग्णांना येत आहेत. कारण, त्यांना गृहविलगीकरणाचा सल्ला दिला जात आहे. असे असले तरी, डॉक्टर रुग्णांच्या संपर्कात राहात आहेत.
शहरात कोरोना व ओमिक्रॉन संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातील कोरोना पॉझिटिव्ह पण लक्षणे नसलेल्या, सौम्य लक्षणे असलेल्या व गंभीर रुग्णांबाबतचा प्रोटोकॉल आयुक्त राजेश पाटील यांनी जाहीर केला आहे. त्यानुसार रुग्ण दाखल करून घेण्याची सूचना वायसीएमचे अधिष्ठाता, महापालिकेच्या सर्व रुग्णालयांचे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, अण्णासाहेब मगर जम्बो रुग्णालय व ऑटो क्लस्टर कोविड सेंटरच्या नोझल अधिकाऱ्यांना केली आहे. नवीन भोसरी रुग्णालय, थेरगाव रुग्णालय, जिजामाता रुग्णालय, आकुर्डी रुग्णालय, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय सुरू केले आहेत. ऑटो क्लस्टर व अण्णासाहेब मगर जम्बो कोविड रुग्णालय सुरू करण्याची कार्यवाही सुरू आहे. रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी आयुक्तांनी प्रोटोकॉल जाहीर केला.

रुग्ण दाखल करण्याची कार्यवाही
- तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची कोरोना चाचणी करावी, त्याची व रेफर केल्याची माहिती ‘मी जबाबदार अॅप’मध्ये भरावी
- वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करून गृहविलगीकरण वा रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे किंवा नाही याची कार्यवाही करावी
- खासगी रुग्णालयातील आयसीयूतील गंभीर रुग्णाला महापालिकेच्या आयसीयूत घेऊ नये
- महापालिका हद्दीतील रुग्णांना प्राधान्य द्यावे
- प्रोटोकॉलमधील सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे, अडचणी असल्यास आयुक्त किंवा अतिरिक्त आयुक्तांची पूर्व परवानगी घ्यावी

रुग्णांसाठी अधिकाऱ्यांना सूचना
- लक्षणे नसलेल्या रुग्णाचे गृहविलगीकरण करावे
- सौम्य लक्षणे असल्यास औषधोपचार देऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मोबाईल क्रमांक व गृहविलगीकरणाचे बुकलेट देऊन घरी सोडावे
- सौम्य लक्षणे व दुर्धर आजार असल्यास कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करावे, संदर्भिय चिठ्ठी देऊन ‘मी जबाबदार ॲप’मध्ये माहिती भरावी
- जम्बो रुग्णालयात थेट रुग्ण दाखल करता येणार नाही. त्यासाठी रुग्णालयातील संदर्भित चिठ्ठी रुग्णाकडे आवश्यक आहे
- वायसीएम रुग्णालयात नॉन कोविड सेवा सुरू राहतील. गरजेनुसार कोविड सेवा सुरू करण्यात येईल.

रुग्णालयांचे वर्गीकरण (मध्यम व गंभीर लक्षणे)
रुग्णालये/लक्षणे
नवीन भोसरी/ओमीक्रॉन बाधित रुग्ण
थेरगाव व जिजामाता/लहान मुले
आकुर्डी रुग्णालय/अन्य रुग्ण
वायसीएम/नॉन कोविड रुग्णांसाठी
जम्बो कोविड सेंटर/डॉक्टरांनी शिफारस केलेले

‘‘गृहविलगीकरणात असताना रुग्णांनी मानसिक ताण घेऊ नये. पूर्ण वेळ आराम करावा. काही त्रास झाल्यास घाबरून जाऊ नये. डॉक्टरांशी संपर्क साधावा. त्यांच्या सूचनेनुसार औषधे घ्यावीत. आहाराकडे लक्ष द्यावे.’’
- कुंडलिक आमले, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, वायसीएम

दृष्टिक्षेपात सक्रिय रुग्ण
रुग्णालयात/६५००
गृहविलगीकरणात/७०००
एकूण/५००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT