पिंपरी-चिंचवड

शहरातील नागरिकांना शास्तीकर माफ करून दिलासा द्यावा

CD

पिंपरी, ता. ११ ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांना शास्तीकर माफ करून दिलासा द्यावा, अशी मागणी भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे, अवैध बांधकाम करणाऱ्‍या घरगुती इमारतींना सध्या त्यांच्या क्षेत्रफळानुसार शास्तीकर आकारण्यात येतो. यामध्ये एक हजार चौरस फुटांपर्यंत शास्ती नाही, एक हजार ते दोन हजार चौरस फुटांपर्यंत ५० टक्के आणि दोन हजार चौरस फुटांपुढील मालमत्ता कराच्या दुप्पट दर आहे. मात्र, अवैध बांधकामांना माफ करावा. तसेच या मिळकतींची शास्ती सरसकट शासनाच्या मान्यतेने माफ करण्यात यावी, असा ठराव १० जानेवारी २०२० महापालिका सभेमध्ये मंजूर केला आहे. मात्र, त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. तसेच बिगरनिवासी व्यावसायिक व औद्योगिक बांधकामधारकांचा कोणताही विचार केलेला नाही.

कोरोनामुळे नागरिकांची आर्थिक स्थिती हलाखीची झाली आहे. शहरामध्ये कामगारांची संख्या लक्षणीय असून शास्तीकर भरणेही जिकिरीचे झालेले आहे. त्यामुळे शास्तीकर सरसकट माफ करावा व प्रक्रियेस विलंब होणार असल्याने तत्पूर्वी दिलासा देण्यासाठी शास्तीकर निश्चित करावा. सर्व क्षेत्रफळाची निवासी अवैध घरांना शास्तीकर पूर्ण माफ, १ ते ५०० चौरस फूट बिगरनिवासी गाळ्यांना शास्तीकर २५ टक्के, ५०१ चौरस फुटापुढील बिगरनिवासी गाळ्यांना शास्तीकर ५० टक्के याप्रमाणे दर निश्चित करावे, असेही निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Navy Sailor Family Death: नौदलाच्या खलाशासह पत्नी अन् २ मुलांचे मृतदेह आढळल्यानं खळबळ, २ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश

Raigad News: महाड MIDCमध्ये पुन्हा गॅसगळती, एका कामगाराचा मृत्यू, ८ जण जखमी

Viral Video : तीन वर्षांचा चिमुकला आईची तक्रार घेऊन थेट पोलीस चौकीत पोहोचला, म्हणाला- तिला जेलमध्ये टाका; कारण ऐकून पोलिसांनाही आवरेना हसू

Marathi News Live Updates : मुंबईत भारतीय नौदलाचा खलाशी, पत्नी आणि दोन अल्पवयीन मुले मृतावस्थेत आढळली

IND vs SL 1st Test : एकही चेंडू न खेळता, भारत-श्रीलंकेचे खेळाडू जेवायला गेले! गौतम गंभीरचं डोकं फिरलं; गॉलवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT