पिंपरी-चिंचवड

सलिल कुलकर्णी यांना ‘आशा भोसले पुरस्कार’ जाहीर पद्मश्री डॉ. गिरीश प्रभुणे, सावनी रवींद्र यांचा होणार नागरी सत्कार

CD

पिंपरी, ता. ४ : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेने संगीतकार व गायक यांना दिला जाणारा स्वरसम्राज्ञी ‘आशा भोसले पुरस्कार’ यंदा संगीतकार, दिग्दर्शक डॉ. सलिल कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी- चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी नाट्यपरिषदेचे कार्यकारिणी सदस्य किरण येवलेकर, नरेंद्र आमले, सुदाम परब, राहुल भोईर, संतोष शिंदे, गौरी लोंढे, रूपाली पाथरे आदी उपस्थित होते. भाऊसाहेब भोईर म्हणाले, ‘‘प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्ताने २००२ पासून ‘स्वरसम्राज्ञी आशा भोसले पुरस्कार’ दिला जात आहे. गेल्यावर्षी कोरोनामुळे पुरस्कार वितरण सोहळा झाला नाही. २०२० चा पुरस्कार कोरोनाचे नियम पाळून लवकरच घेण्याचे नियोजन आहे. एकोणिसावा पुरस्कार डॉ. सलिल कुलकर्णी यांना जाहीर झाला असून पुरस्काराचे स्वरूप एक लाख ११ हजार रुपये रोख, शाल व सन्मान चिन्ह असे आहे. प्रसिद्ध संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने पुरस्काराची निवड केली आहे. तसेच यासोबत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखा, पिंपरी-चिंचवड कलारंग प्रतिष्ठान व श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल प्रतिष्ठान आयोजित २३ वी ‘कै. राम गणेश गडकरी करंडक राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा’ यंदा ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे होणार आहे.


सावनी रवींद्र, डॉ. प्रभुणे यांचा सत्कार

या नियोजित कार्यक्रमात पिंपरी-चिंचवड शहराच्या नावलौकिकात भर घालणारे डॉ. गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल व संगीत क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कार विजेती सावनी रवींद्र यांचा नागरी सत्कार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यांना मिळाला हा पुरस्कार
यापूर्वी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, संगीतकार खय्याम, रवींद्र जैन, बाप्पी लहरी, प्यारेलालजी, आनंदजी, हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, गायक अनु मलिक, शंकर महादेवन, शास्त्रीय गायक पंडित शिवकुमार शर्मा, सुरेश वाडकर, हरीहरन व सोनू निगम, सुनिधी चौव्हाण, पार्श्वगायक पद्मभूषण उदित नारायण, सुप्रसिध्द गायक रूपकुमार राठोड, अवधूत गुप्ते यांना हा पुरस्कार प्रदान केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनाेज जरांगेंचा मोठा निर्णय? १८व्या दिवशी मुंबईकडे निघण्याची तयारी; उपोषणस्थळी समर्थकांची गर्दी

Saundatti Dharwad Road Accident : बेळगावसाठी काळा दिवस! १५ तासांत ७ जणांचा मृत्यू; सौदत्ती-धारवाड मार्गावर भीषण अपघातात तीन मित्र जागीच ठार

Mumbai-Goa Highway Chemical Leak : मुंबई-गोवा महामार्गावर पुगाव हद्दीत ज्वलनशील रसायन वाहून नेणाऱ्या कंटेनरला अपघात; सर्व यंत्रणांच्या सतर्कतेमुळे गणेशोत्सवातील भीषण दुर्घटना टळली

Latest Marathi News Update : मनोज जरांगे पाटील ११ वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईचे दिशेने रवाना होणार

टीम इंडियाने करंडक जिंकला, नक्वींच्या हातून ट्रॉफीही घेतली नाही; आता ACC अध्यक्षांच्या खुर्चीवर टांगती तलवार, पुन्हा निवड होणार का?

SCROLL FOR NEXT