पिंपरी-चिंचवड

खजुराहो लेणी म्हणजे केवळ कामशिल्पे नाहीत!

CD

पुणे, ता. २८ ः खजुराहो लेण्या म्हणजे केवळ कामशिल्पे, अशी उभी केलेली प्रतिमा हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे. ‘एकटीचा सफरनामा’ हे पुस्तक वाचून काही लोकांना जरी खजुराहो लेण्या पाहण्याची इच्छा झाली, तरी ते मी या पुस्तकाचे यश मानेल, असे मत प्रसिद्ध गायिका डॉ. राधा मंगेशकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
डॉ. मंगेशकर लिखित आणि कॉन्टिनेंटल प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘एकटीचा सफरनामा’ या पुस्तकाचे प्रकाशन अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड यांच्या हस्ते झाले. शिरीष रायरीकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. ‘खजुराहो लेण्यांमधील केवळ दहा टक्के शिल्पे कामशिल्पे असून उर्वरित सर्व शिल्पे विज्ञान आणि ज्ञानाने भरलेली आहेत, असे डॉ. मंगेशकर यांनी सांगितले.
यावेळी डॉ. वाड म्हणाल्या, ‘‘प्रवास तुम्हाला अंतर्मुख करत असतो आणि अध्यात्माचा अत्युच्च अनुभव देत असतो. माणसाने जास्त बोलण्यापेक्षा ऐकण्यावर आणि पाहण्यावर भर द्यावा. म्हणून परमेश्वराने आपल्याला दोन डोळे, दोन कान आणि एकच तोंड दिलेले आहे.’’
यावेळी कॉन्टिनेन्टल प्रकाशनाच्या संचालिका देवयानी कुलकर्णी-अभ्यंकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पोमण यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Crime : कोल्हापुरात बेल्टने मारहाण करत 20 वर्षीय मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; भीती घालून दोन वर्षांपासून ठेवले शारीरिक संबंध

Chhatrapati Sambhajinagar: व्यावसायिकाला डोळ्यात मिरची पूड टाकून लुटले; जेवणाची ऑर्डर देण्यासाठी बोलावले;दागिन्यासह रोख रक्कम पळविली

Latest Marathi News Live Update : दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज विजांसह वादळी पावसाची शक्यता

Sangola Accident: घराच्या थोड्याच अंतरावर काळाचा घाला! टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील दांपत्य ठार; सांगोला-पंढरपूर मार्गावर भीषण अपघात..

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रावर दुहेरी संकट ! मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळी पाऊस तर 'या' जिल्ह्यांत उष्णतेची लाट

SCROLL FOR NEXT