पिंपरी-चिंचवड

मुलांना २४ केंद्रांवर लस; ज्‍येष्ठांना ३९ केंद्रांवर बुस्टर

CD

पिंपरी, ता. १२ ः शहरातील १५ ते १८ वयोगटातील मुलांचे गुरुवारी (ता. १३) २४ केंद्रांवर महापालिकेतर्फे कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले जाणार आहे. तर, हेल्थ केअर वर्कर, फ्रंट लाइन वर्कर, साठ वर्षांवरील नागरिक आणि बीपी, मधुमेह, कर्करोग अशा सहव्याधी असलेल्या नागरिकांना ४९ केंद्रांवर प्रिकॉशन अर्थात बूस्टर डोस दिला जाणार आहे. स्तनदा माता व गर्भवतींसाठी आठ केंद्रांवर डोस राखीव ठेवले आहेत, असे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने कळवले आहे.
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार महापालिकेने १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण सुरू केले आहे. आता हेल्थ केअर वर्कर, फ्रंट लाइन वर्कर व ६० वर्षांवरील ज्येष्ठांना बूस्टर डोस दिला जात आहे. १५ ते १८ वयोगटातील मुलांचेही लसीकरण सुरू आहे. गुरुवारी (ता. १३) मुलांसाठी २२ केंद्रांवर प्रत्येकी पाचशे आणि प्रेमलोक पार्क दवाखाना केंद्रावर ७५० आणि नवीन थेरगाव रुग्णालय केंद्रावर एक हजार डोस उपलब्ध असतील.

कोव्हॅक्सिनचे केंद्र
कोव्हॅक्सिन लस कुटे हॉस्पिटल आकुर्डी, जुने तालेरा रुग्णालय चिंचवड, नेत्र रुग्णालय मासुळकर कॉलनी, नवीन थेरगाव रुग्णालय, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळे सौदागर, लांडगे नाट्यगृह भोसरी, स्वामी समर्थ बॅडमिंटन हॉल शिवतेजनगर, नवीन जिजामाता रुग्णालय पिंपरी, कर्मवीर भाऊराव पाटील शाळा पिंपरी वाघेरे, निळू फुले नाट्यगृह नवी सांगवी या केंद्रांवर दिली जाणार आहे.

गर्भवतींसाठी व्यवस्था
स्तनदा माता व गर्भवतींसाठी अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी, कुटे हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, आचार्य अत्रे रंगमंदिर संत तुकारामनगर पिंपरी, अहिल्याबाई होळकर स्कूल सांगवी, खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय पिंपरी, जुने तालेरा रुग्णालय चिंचवड या केंद्रांवर लस देण्याची व्यवस्था केली आहे.

असे आहे नियोजन
- अठरा वर्षांवरील सर्वांना व बूस्टर डोस घेणाऱ्यांना प्रत्येक केंद्रांवरील २० टक्के डोस कोविन ॲपद्वारे स्लॉट बुकिंग करून व ८० टक्के डोस ऑन दि स्पॉट नोंद करून दिले जातील
- किऑक्स यंत्रणेद्वारे टोकन घेतलेल्यांना प्राधान्य असेल, सकाळी १० ते सायंकाळी पाच अशी लसीकरणाची वेळ आहे. काही केंद्र सकाळी नऊ ते रात्री आठपर्यंत सुरू राहतील
- ‘कोविन ॲप’वर सकाळी आठ वाजता नोंदणी सुरू होईल, मुलांसाठीच्या प्रत्येक केंद्रावर प्रत्येकी ५० टक्के डोस कोविन ॲपद्वारे व ऑन दि स्पॉट नोंदणी करून दिले जातील
- बुस्टर डोस घेण्यासाठी हेल्थ केअस वर्कर, फ्रंट लाइन वर्कर, ६० वर्षांवरील ज्येष्ठ व सहव्याधी असलेल्यांनी दुसरा डोस घेऊन नऊ महिने किंवा ३९ आठवडे झालेले असावेत

दृष्टिक्षेपात आजचे लसीकरण
लाभार्थी / केंद्र / उपलब्ध डोस
१५ ते १८ वयोगटातील मुले / २४ / १२,७५०
हेल्थ व फ्रंटलाइन वर्कर, ज्येष्ठ (बूस्टर) / ४९ / २३,०००
१८ वर्षावरील सर्व (कोव्हिशिल्ड) / ३९ / १९,५००
१८ वर्षावरील सर्व (कोव्हॅक्सिन) / १० / ३,५००
(टीप ः मुलांना कोव्हॅक्सिन लस दिली जाईल. आधी घेतलेल्या लशीचाच बूस्टर डोस असेल)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण कार्तिकचा फिनिशिंग टच अन् बेंगळुरूने साधली विजयाची हॅट्ट्रीक

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT