पिंपरी-चिंचवड

गुन्हे वृत्त

CD

तिघांना मारहाण करून
भोसरीतून रोकड लुटली

पिंपरी, ता. १३ : दुकानदारासह तिघांना बेदम मारहाण करीत रोकड लुटल्याची घटना भोसरी येथे घडली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी विकास लादुराम चौधरी (रा. भाजी मंडईजवळ, भोसरी गावठाण) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुन्ना तिवारी (ता. २७), शिवम पांडे (वय २५), रमजान (वय २८) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांनी आरोपींना किराणा सामान उधार दिले नाही. यावरून सोमवारी (ता. १०) सायंकाळी सहाच्या सुमारास फिर्यादीच्या दुकानात आलेल्या आरोपींनी दुकानातील अंडी व इतर किराणा सामानाची तोडफोड करून पाच हजारांचे नुकसान केले. त्यानंतर फिर्यादीला मारहाण करून गल्ल्यातील दीड हजारांची रोकड लुटली. त्यानंतर बुधवारी (ता. १२) रात्री नऊच्या सुमारास आरोपी पुन्हा फिर्यादीच्या दुकानात आले. फिर्यादीसह दुर्गाराम चौधरी यांना हाताने मारहाण केली. अशोक चौधरी यांना दगड फेकून मारून जखमी केले. तसेच शिवीगाळ करीत अशोक चौधरी यांच्या खिशातील पाच हजारांची रोकड काढून केली. याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.


भोसरीत दोन लाखांचा माल चोरीला
दोन वेगवेगळ्या कंपनीतून दोन लाखांचा माल चोरीला गेला. ही घटना भोसरी एमआयडीसी येथे घडली. या प्रकरणी अमेय अविनाश शेवाळे (रा. आनंद पार्क, धानोरी रोड, विश्रांतवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची भोसरी एमआयडीसीतील ‘जे’ ब्लॉक येथे सुयश इंजिनिअरिंग कंपनी असून, चोरटा या कंपनीत शिरला. कंपनीतील टेबलवर ठेवलेल्या तीन पिशवीतील एक लाख २८ हजार रुपये किमतीचे तांब्याचे छोटे पीस व इतर साहित्य चोरून नेले. तसेच विकास टिलकधारी विश्वकर्मा यांच्या सेक्टर क्रमांक ७, एमआयडीसी भोसरी येथील ओम इंजिनिअरिंग या शॉपमधून ६८ हजार रुपये किमतीचे सामान चोरीला गेले. या दोन्ही घटनेप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

मोशीत विवाहितेसह लहान मुलीचा छळ
विवाहितेला मारहाण करून तिच्यासह लहान मुलीला घराबाहेर काढून उपाशी ठेवले. याप्रकरणी पती व सासू, सासऱ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार मोशी येथे घडला. याप्रकरणी पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार लक्ष्मीकांत मोरेश्वर खैरकर (वय ३५), सासरा मोरेश्वर विठ्ठल खैरकर (वय ६२) व सासू (सर्व रा. जुना मोशी आळंदी रोड , मोशी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी फिर्यादीसह तिच्या लहान मुलीला घराबाहेर काढून उपाशी ठेवले. वारंवार हाताने मारहाण करून शिवीगाळ करीत फिर्यादीचा शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

पोलिसात तक्रार केल्यावरून गोंधळ
पोलिसात तक्रार केल्याच्या रागातून तरुणीच्या घरासमोर गोंधळ घातला. तरुणीशी गैरवर्तन करीत तरुणीच्या आईला मारहाण केली. हा प्रकार चिंचवड येथे घडला. याप्रकरणी पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुनील परशुराम कांबळे (वय २४, रा. नागसेन नगर, बिजलीनगर, चिंचवड) याला पोलिसांनी अटक केली. फिर्यादी या त्यांच्या आई व दोघी बहिणींसह मंगळवारी (ता. ११) सायंकाळी चारच्या सुमारास घरी जात होत्या. त्यावेळी फिर्यादी व त्यांच्या बहिणीने आरोपी विरोधात पोलिसात केलेल्या तक्रारीचा राग मनात धरून आरोपी त्यांच्या घरासमोर आला. फिर्यादीच्या आईशी वाद घालून फिर्यादीशी अश्लील वर्तन केले. त्यानंतर फिर्यादीच्या आईला हाताने मारहाण करीत शिवीगाळ केली. तसेच तुझ्या भावाला मारून टाकतो, अशी धमकी दिली. याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

फुगेवाडीत विवाहितेचा छळ
पतीकडे पैसे मागितल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. हा प्रकार फुगेवाडी येथे घडला. याप्रकरणी पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार महंमद रफिक शेख,
इब्राहिम रहीम शेख, जुलेखा इब्राहिम शेख, दीर सलीम शेख, नणंद व नणंदेचा पती आरिफ बशीर पिंजारी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी घरगुती कारणावरून तसेच पतीकडे पैसे मागितल्याच्या कारणावरून विवाहितेला शिवीगाळ, मारहाण करून धमकी दिली. फिर्यादी यांचा शारीरिक, मानसिक व आर्थिक छळ केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT