पिंपरी-चिंचवड

सिटी प्राईड शाळेला शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

CD

यंग बझ लोगो वापरणे
एनआयइ कडून

सिटी प्राईड शाळेला शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

पिंपरी, ता. १३ : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) २०२०-२१ या कालावधीत पार पडलेल्या सिटी प्राईड निगडी शाळेतील एकूण सात विद्यार्थी शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेत सीबीएसईच्या गुणवत्ता यादीत झळकले.

या यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षिका अमिता पंडित यांनी मोलाचे मार्गदर्शन केले होते. अभिमानास्पद यशाचे साक्षीदार असणारे सर्व विद्यार्थी, पालक व मार्गदर्शक शिक्षिका अमिता पंडित यांचे मनापासून अभिनंदन केले. सिटी प्राईड स्कूलसाठी पुरस्कारांची मालिका जिंकण्याचा हा क्षण म्हणजे एक आनंदयात्राच आहे. विद्यार्थ्यांचे प्रयत्न, सातत्य, जिद्द व अमिता पंडित यांचे प्रोत्साहन ही यशाची मालिकाच आहे. पूर्वप्राथमिक उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) मध्ये देवांश सचिन नारके ९२ टक्के मिळवून राज्यातून दुसऱ्या क्रमांकावर, प्रणव मनोहर पाटील ९०.६ टक्के मिळवून चौथ्या क्रमांकावर, श्रुती चेतन कुरकुरे ८९.३ टक्के मिळवून सहाव्या क्रमांकावर, सुमीत श्रीकृष्णा सिंदगी ८८.६ टक्के मिळवून सातव्या क्रमांकावर, रिशिता अजित जांभेकर ८७.३ टक्के मिळवून नवव्या क्रमांकावर, वेदांत राजेश अफ्रे ८७.३ टक्के मिळवून नवव्या क्रमांकावर आहेत. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) मधून सायली रविराज गायकवाड ८४ टक्के मिळवून राज्यात नवव्या क्रमांकावर आलेली आहे.
शाळेच्या संचालिका डॉ. अश्विनी कुलकर्णी, डॉ. दीपाली सवाई, प्राचार्या माया सावंत, उपप्राचार्या नेत्रे कुलकर्णी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Maskar Silver Medal : मुलीच्या रायफलसाठी वडिलांनी विकली जमीन; कोल्हापूरच्या सोनम मस्करचे आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक

Satara Crime: जमिनीचा वाद पेटला अन्‌ भावकीतील युवकावर दांडक्याने हल्ला; उपचार सुरू असतानाच मृत्यू

Importance of Literature : मनाची लाखो शकलं करणाऱ्या काळात साहित्य का गरजेचं आहे?

Marathi News Live Updates : भुसावळ शहरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मानवी मृतदेह

Pune News: कुत्रा भुंकल्याने वाद पेटला; वाघोलीत दोन बहिणींवर दगड, सळई अन् लाथाबुक्क्यांनी हल्ला

SCROLL FOR NEXT