पिंपरी-चिंचवड

चिंचवडमध्ये टोळक्याने माजवली दहशत

CD

चिंचवडमध्ये टोळक्याने माजवली दहशत

पिंपरी, ता. १३ : दुचाकीवरून आलेल्या टोळक्याने कोयते व तलवार भिरकावून दहशत माजवली. तसेच परिसरातील दहा वाहनांची तोडफोड केली. या घटनेमुळे नागरिक सैरावैरा पळू लागले, दारे, खिडक्या बंद करून घरात बसले. हा प्रकार चिंचवड येथे घडला.

याप्रकरणी ज्ञानेश्वर रामभाऊ सूर्यवंशी (रा. ओम कॉलनी क्रमांक ३, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिवानंद हेळवे, बसवराज हेळवे, आदित्य आंबुसकर, सोमनाथ माने, शाम कोळी व त्यांचे साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी हे फिर्यादी यांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादींसोबत असलेल्या पूर्व वैमनमस्यातून बुधवारी (ता. १२) रात्री पावणे बाराच्या सुमारास आरोपी दरोडा घालण्याच्या उद्देशाने ओम कॉलनी क्रमांक तीन येथे हातात कोयते व तलवार घेऊन आले. फिर्यादी यांच्या बंगल्याच्या गेटवर कोयते व तलवार मारून फिर्यादी व त्यांच्या मुलाच्या नावाने शिवीगाळ केली. तसेच कॉलनीतील लोकांना मोठमोठ्याने शिवीगाळ करून हातातील कोयते व तलवार भिरकावत दहशत माजवली. यामुळे कॉलनीतील लोक त्यांना घाबरून सैरावैरा पळू लागले. घराचे दरवाजे खिडक्या बंद करून घरात जाऊन बसले. त्यानंतर आरोपींनी कॉलनीत राहणाऱ्या लोकांच्या दहा गाड्या फोडून नुकसान केले. तसेच फिर्यादी यांचे शेजारी रोहित अनिल पवार यांच्या मोटारीतून दहा हजारांची रोकड दरोडा घालून चोरून नेली. याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT