पिंपरी-चिंचवड

भोसरीत पतंगाच्या मांजाने दुचाकीस्वाराचा गळा कापला

CD

पिंपरी, ता. १४ : पतंगाच्या नायलॉन मांजाने दुचाकीस्वाराचा गळा कापल्याची घटना भोसरी येथे घडली. यामध्ये दुचाकीस्वाराच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली. कैलास पवार (रा. भोसरी) असे या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पवार हे शुक्रवारी (ता.१४) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास दुचाकीवरून भोसरीतील लांडेवाडी येथून जात असताना अचानक गळ्याला काही अडकल्यासारखे वाटले. गळ्याला हात लावला असता रक्त दिसले. दुचाकी बाजूला घेऊन पहिले असता गळ्यात मांजा अडकल्याचे स्पष्ट झाले. या घटनेत पवार यांच्या गळ्याला दुखापत झाली. तातडीने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान, नायलॉन मांजावर बंदी असतानाही काही दुकानामध्ये नायलॉन मांजाची विक्री होत असल्याचे दिसून येते. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कूलिंग चेंबरमध्ये स्फोटानंतर इमारत कोसळली, ९ कामगारांचा मृत्यू; माजी आमदाराच्या मालकीच्या कोल्ड स्टोरेजमध्ये दुर्घटना

Navi Mumbai: मुलगा घरी एकटाच, पालक घरी येताच समोर जे दिसलं त्यानं पायाखालची जमीनच सरकली, नवी मुंबईत काय घडलं?

IPL सारखीच नवी टी२० स्पर्धा, 'या' क्रिकेट बोर्डानं केली घोषणा; सुरुवात कधी?

IPL 2026 Video: धोनी वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत खेळणार? थालाचं उत्तर ऐकून आख्ख्या स्टेडियममध्ये जल्लोष

अमेरिकेचं एक पाऊल मागे, युद्धाला ब्रेक! इराणसोबत सकारात्मक चर्चा, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT