पिंपरी-चिंचवड

पोलिस दलाला कोरोनाचा विळखा

CD

पिंपरी, ता. १५ : पिंपरी-चिंचवड पोलिस दलाला कोरोनाने विळखा घातला आहे. बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अगोदरच अपुरे मनुष्यबळ त्यात कोरोनाचे संकट यामुळे पोलिस ठाण्यात हातावर मोजण्याइतपत कर्मचारीच उपलब्ध असल्याची स्थिती आहे. यामुळे कामकाजावरही परिणाम होत आहे.
कोरोनाची पहिली, दुसरी व आता तिसरी लाट आली तरी कोरोनाचा सामना करीत पोलिस कर्तव्यावर कायम आहेत. कायदा-सुव्यवस्था कायम राखणासाठी अहोरात्र झटत आहेत. या दरम्यान, नागरिकांच्या संपर्कात आल्याने पोलिसांनाही कोरोनाची लागण होत आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेत पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील ११८ अधिकारी व ७४० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. तर पाच जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, परिस्थिती काहीशी आटोक्यात आली असताना डिसेंबरच्या अखेरीला कोरोनाने पुन्हा डोके वर काढले. संसर्गाचे प्रमाण वाढू लागले. पोलिस अधिकारी, कर्मचारीही यामध्ये सापडत आहेत. सध्या आयुक्तालयातील विविध पोलिस ठाण्यांसह विशेष शाखा, खंडणी, दरोडा विरोधी पथक, सायबर सेल, आर्थिक गुन्हे शाखा आदी शाखेतील तब्बल ११२ अधिकारी कर्मचारी बाधित आहेत. काही पोलिस ठाण्यातील तर तब्बल पंधरा ते वीस कर्मचारी बाधित आहेत. बाधितांपैकी काही कर्मचारी रुग्णालयात दाखल आहेत तर काही जण होम आयसोलेट आहेत.
दरम्यान, अगोदरच मनुष्यबळाची कमतरता त्यात जे आहे ते कर्मचारीही कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. तसेच अधिक वयाच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम शक्य असल्यास तसे काम देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच पन्नास वर्षांवरील कर्मचाऱ्यांना कमी गर्दीच्या ठिकाणी नेमणूक दिली जात आहे. त्यामुळे पोलिस ठाण्यासह विविध शाखेत प्रत्यक्ष कामासाठी हातावर मोजण्याइतपत कर्मचारी उपलब्ध आहेत. त्यामुळे कामकाजावर परिणाम होत आहे. बंदोबस्त, नाकाबंदी, तपास आदी कामे कमी मनुष्यबळातच करावी लागत आहेत. सध्या हिंजवडी व भोसरी ठाण्यातील बाधित कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.

शनिवारी २७ जण बाधित
शनिवारी पुन्हा मोठ्या प्रमाणात बाधितांची संख्या वाढली. विविध ठाण्यातील सात अधिकारी व वीस कर्मचारी बाधित आढळले. तर चारजण कोरोनामुक्त झाले.

कर्मचारी पोलिस ठाणेनिहाय
पोलिस ठाणे ः बाधित
भोसरी ः १४
हिंजवडी ः १८
भोसरी एमआयडीसी ः ७
म्हाळुंगे चौकी ः ४
पिंपरी ः ९
शिरगाव चौकी ः १
चिखली ः ५
निगडी ः ३
देहूरोड ः २
सांगवी ः १
चाकण ः ५
तळेगाव एमआयडीसी ः ६
तळेगाव दाभाडे ः १
दिघी ः ३
इतर शाखा ः ३३
एकूण ः ११२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT