RTO-Pimpri-Chinchwad Sakal
पिंपरी-चिंचवड

आरटीओकडून जप्त केलेल्या वाहनांचा पिंपरी चिंचवडमध्ये 'ई-लिलाव'

मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्याअंतर्गत जप्त केलेल्या वाहनांचा जाहीर ‘ई-लिलाव’ मंगळवारी (ता. १६) करण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्याअंतर्गत जप्त केलेल्या वाहनांचा जाहीर ‘ई-लिलाव’ मंगळवारी (ता. १६) करण्यात येणार आहे.

पिंपरी - मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्याअंतर्गत जप्त केलेल्या वाहनांचा (Seized Vehicle) जाहीर ‘ई-लिलाव’ (E-Auction) मंगळवारी (ता. १६) करण्यात येणार आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे (Atul Aade) यांनी कळविली आहे.

आरटीओच्या ‘वायुवेग’ या तपासणी पथकांकडून वेळोवेळी वाहनांची तपासणी मोहीम राबविण्यात येते. यामध्ये वाहतूक नियमाचा भंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई होते. यातील काही वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र, जे वाहनचालक दंड भरत नाहीत, अशी वाहने जप्त केली जातात. त्यांच्यावर खटला भरला जातो. त्यानंतर ही वाहने लिलावात काढण्यात येतात. सध्या आरटीओ कार्यालयाच्या परिसरात जप्त केलेली पुष्कळ वाहने उभी आहेत. या वाहनांमुळे दैनंदिन कामासाठी आरटीओमध्ये येणाऱ्या नागरिकांना वाहन लावण्यासाठी जागाच राहिलेली नाही. बऱ्याच दिवसांपासून उभ्या असलेल्या वाहनांमुळे कार्यालयाच्या परिसरामध्ये अस्वच्छता वाढली आहे. वाहन मालकांना लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आरटीओने वाहनांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.

लिलाव करण्यात येणारी वाहने वाघेश्‍वर पार्किंग येथील आवारात पाहणी करण्यासाठी उपलब्ध आहेत. ई-लिलावात ३४ वाहने उपलब्ध आहेत. यात टुरिस्ट टॅक्सी, ट्रक, बस, हलकी परिवहन वाहने, रिक्षा या वाहनांचा समावेश आहे. या लिलावात सहभागी होण्यासाठी ११ ते १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकेतस्थळावर तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयात ५० हजार रुपये रकमेचा प्रादेशिक परिवहन विभाग पुणे या नावाने अनामत धनादेशासह नावनोंदणी करून प्रत्यक्ष येऊन पूर्तता करावी. या लिलावात जीएसटी धारकांनाच सहभाग होता येणार आहे. सविस्तर माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन आदे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची आज मतमोजणी; सकाळी आठपासून प्रक्रियेला सुरुवात

Accident News: भंडारा जिल्ह्यात अपघाताची घटना; ट्रॅक्टरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

Accident News: इलेक्ट्रिक पोलला कार धडकल्याने युवती ठार, तीन जण जखमी

Satara Crime: कुरिअर कंपनीतील कर्मचाऱ्यानेच दिली दागिन्यांची टीप; महामार्गावर १.५५ कोटींची लूट, १२ तासांत शिवथर, मालगावचे आठ जण जेरबंद

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल; काही भागांत वादळी पाऊस, तर काही ठिकाणी उकाडा कायम

SCROLL FOR NEXT