Corona Patient Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरीकरांना दिलासा! कोरोना संसर्ग दर आला पाच टक्क्यांपेक्षा कमी

मार्च २०२० पासून शहराला कोरोनाने पछाडले आहे. गेल्या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळत होते.

सकाळ वृत्तसेवा

मार्च २०२० पासून शहराला कोरोनाने पछाडले आहे. गेल्या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळत होते.

पिंपरी - गेल्या महिन्यात कोरोना संसर्गाचे (Coroan Infection) प्रमाण वाढले होते. त्यामुळे महापालिकेच्या (Municipal) सर्वच तपासणी केंद्रांवर गर्दी असायची. सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे असलेल्या १२ हजारांवर नागरिकांची दिवसाला तपासणी (Cheaking) केली जात होती. पॉझिटिव्हिटी (Positivity Rate) २० ते २५ टक्क्यांवर गेली होती. हे चित्र आता बदलले आहे. दिवसाला तपासणीसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या सहा हजारांपर्यंत खाली आली असून, पॉझिटिव्हिटी पाच टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे. शहरासाठी ही बाब दिलासादायक आहे.

मार्च २०२० पासून शहराला कोरोनाने पछाडले आहे. गेल्या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळत होते. त्यातील काहींना ओमिक्रॉन संसर्ग झाल्याचेही आढळले. शिवाय, थंडी, ऊन व पाऊस अशा मिश्र हवामानामुळे सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणे असा त्रास असलेल्या रुग्णांची संख्याही वाढली होती. त्यामुळे महापालिकेने तपासणीचे प्रमाण वाढवून २४ केंद्रांवर सोय केली. त्या ठिकाणी ॲंटिजेन आणि आरटीपीसीआर टेस्ट केली जात आहे. मात्र, फेब्रुवारीच्या दुसऱ्या सप्ताहापासून संसर्गाचे प्रमाण कमी झालेले दिसते. पॉझिटिव्हिटीचे प्रमाणही कमी झालेले आहे.

तपासणी केंद्र

आकुर्डीतील कुटे हॉस्पिटल, जुने आकुर्डी रुग्णालय, आरटीटीसी सेंटर शाहूनगर, साई अंब्रेला संभाजीनगर दवाखाना, यमुनानगर रुग्णालय, म्हेत्रेवस्ती दवाखाना, रुपीनगर दवाखाना, तळवडे दवाखाना, चिंचवडमधील जुने तालेरा रुग्णालय, ओजस हॉस्पिटल पुनावळे, भोंडवे कॉर्नर रावेत, गावडे पेट्रोल पंप चिंचवड, पिंपरीतील जुने व नवीन जिजामाता रुग्णालय, पिंपळे सौदागर दवाखाना, कर्मवीर भाऊराव पाटील शाळा पिंपरी वाघेरे, खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, नवीन थेरगाव रुग्णालय, इंदिरा गांधी प्रसूतिगृह जुनी सांगवी व बॅडमिंटन हॉल काटेपूरम चौक पिंपळे गुरव, जुने भोसरी रुग्णालय, मोशी दवाखाना, वायसीएम रुग्णालय, खराळवाडी दवाखाना यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: अमेरिकेने व्याजदर वाढवले अन् एकाच दिवसात सोन्याच्या भावात मोठा बदल! तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव पाहा

Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेत 5 हजार कोटींचा घोटाळा? सुप्रिया सुळेंच्या गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ, आकडेवारीतील फरकावरून सरकारवर चौफेर टीका

तुझ्यासाठी प्रेमाची व्याख्या काय? तेजश्री प्रधानने साध्या सरळ शब्दात सांगितलं; म्हणते- इतका जवळचा एक माणूस...

Marathi News Live Updates : महाराष्ट्रात iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max ची अधिकृत विक्री सुरू; मुंबईतील Apple Store बाहेर ग्राहकांची मोठी गर्दी

Petrol Diesel Price: UPI वरील नवीन चार्जनंतर पेट्रोल-डिझेलचे भाव वाढणार? पंप डीलर्सचा सरकारला प्रस्ताव; आज कितीला मिळतंय?

SCROLL FOR NEXT