covaxin
covaxin sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : कोव्हॅक्सिन लशीचा अपुऱ्या साठ्याचा फटका परीक्षार्थ्यांना

सकाळ वृत्तसेवा

कोरोनाच्या सावटाखाली दहावी व बारावी बोर्ड परीक्षा मार्चपासून सुरू होत आहेत. परीक्षेच्या तोंडावर लसीकरण आवश्‍यक आहे.

पिंपरी - कोरोनाच्या (Corona) सावटाखाली दहावी (SSC) व बारावी बोर्ड परीक्षा (HSC Board Exam) मार्चपासून सुरू होत आहेत. परीक्षेच्या तोंडावर लसीकरण (Vaccination) आवश्‍यक आहे. मात्र कोव्हॅक्सिन लशीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने, गेल्या चार दिवसांपासून १५ ते १८ वयोगटातील परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे (Examinees Students) लसीकरण ठप्प झाले आहे. अक्षरशः रोज शेकडो मुलांना लशीच्या शोधार्थ फिरावे लागत आहेत. अनेक विद्यार्थी लसीकरण न करता परत जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च, तर बारावीची लेखी चार मार्चपासून ऑफलाइन होणार आहे. त्यासाठी मुलांनी लसीकरण करणे आवश्‍यक आहे. १२ फेब्रुवारीपासून शहरात कोव्हॅक्सिन लसीचा पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे शहरातील ९५ टक्क्यांपेक्षा जास्त केंद्रांवर कोव्हॅक्सिनचे लसीकरण बंद पडले आहे. याचा सर्वाधिक फटका परीक्षार्थी विद्यार्थ्यांना बसतोय. १४ फेब्रुवारीपासून विविध शाळांमध्ये बारावीच्या मुलांच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, प्रकल्प आणि तत्सम परीक्षा सुरू झाल्या आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना लशीची गरज असताना शासनाकडून लशीचा साठा उपलब्ध नसल्यामुळे मोठी गैरसाय होत आहे. कोरोना बचावासाठी मुलांचे लसीकरण महत्त्वाचे असल्याचे पालकांचा आणि मुलांचा देखील आग्रह आहे. त्यामुळे लस उपलब्ध होणे आवश्यक आहे.

‘महापालिका क्षेत्रामध्ये लसीकरण केंद्रावर रविवार पासून विद्यार्थ्यांना देण्यात येणारा कोव्हॅक्सिन लशीचा पुरवठा संपला आहे. त्यामुळे मुलांचे लसीकरण थांबले आहे. या लसीकरण केंद्रावर रोज शेकडो विद्यार्थी लसीकरण न करता परत जात आहेत. शिक्षण विभागाने लसीकरण झाले नसेल तरीही परीक्षा देता येईल, पण लस घ्या असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शालेय स्तरावरून लसीकरण सक्तीचे केल्याने बहुतांश विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.’

- शरण शिंगे, पालक

‘लसीकरणाच्या बाबतीत सरकारने जरी बदल केले असले तरी मुलांचे लसीकरण शंभर टक्के झाले पाहिजेत. या संदर्भात आम्ही केंद्रावर निरीक्षण केले असून अनेक पालक व विद्यार्थ्यांनी अत्यंत चीड व्यक्त करीत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने लवकरात लवकर कोव्हॅक्सिन लस पुरवठा उपलब्‍ध करून द्यावा.’

- तुकाराम गायकवाड, पालक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket Team : जिंकलेत आयर्लंडविरूद्ध अन् म्हणे पाकिस्तान जगातील सर्वोत्तम संघ... PCB च्या नक्वींनी कळसच गाठला

Pune Traffic : मेट्रोच्या कामामुळे सिमला ऑफिस चौकाजवळ वाहतुकीत बदल

PM Modi Mumbai roadshow : ''जुने रेकॉर्ड तोडणार'' मोदींच्या मुंबईतील 'रोड शो'ला तुफान प्रतिसाद; पंतप्रधान म्हणाले...

IPL 2024 RR vs PBKS Live Score: राजस्थानचा सलग चौथा पराभव! कर्णधार सॅम करनच्या संयमी खेळीनं पंजाबला मिळवून दिला विजय

Pune Crime News : महादेव ॲपद्वारे ऑनलाइन सट्टा चालविणाऱ्या कॉल सेंटरवर छापा

SCROLL FOR NEXT